माजी महापौर सई खराडे राष्ट्रवादीच्या वाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:23 AM2021-01-22T04:23:10+5:302021-01-22T04:23:10+5:30
कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी माजी महापौर सई खराडे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यानंतर त्या ...
कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी माजी महापौर सई खराडे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यानंतर त्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली. मुश्रीफ यांना यापूर्वीच घरी येण्याचे निमंत्रण दिले होते. या भेटीमध्ये महापालिका निवडणूक अथवा राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चर्चा झाली नसल्याचे खराडे यांनी स्पष्ट केले.
मंत्री मुश्रीफ यांनी शिवाजी पेठेतील सई खराडे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. त्यांचे स्वागत अजित खराडे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. त्यांच्या भेटीचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. सई खराडे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार, अशी चर्चाही शिवाजी पेठेत रंगली.
सई खराडे यांचे चिरंजीव शिवतेज खराडे चंद्रेश्वर (प्रभाग क्रमांक ५४)मधून महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यांनी प्रचारही सुरु केला आहे. राष्ट्रवादीकडे त्यांनी उमेदवारी मागितली आहे. याच प्रभागातील नगरसेविका शोभा बोंद्रे यांचे चिरंजीव माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रेही याच प्रभागातून निवडणूक लढविणार आहेत. बोंद्रे आणि खराडे जवळचे नातेवाईक असून, या निवडणुकीबद्दल उत्सुकता आहे. त्यामुळे या भेटीने चर्चेेत भर घातली.
फोटो : २१०१२०२१ कोल केएमसी सई खराडे न्यूज
ओळी : कोल्हापुरातील माजी महापौर सई खराडे यांच्या घरी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी अजित खराडे, शिवतेज खराडे आदी उपस्थित होते.
सई खराडे यांचे चिरंजीव शिवतेज खराडे महापालिकेची निवडणूक चंद्रेश्वर प्रभागातून लढविणार आहेत.
फोटो : २१०१२०२१ कोल सई खराडे न्यूज