गडहिंग्लज पंचायत समितीच्या माजी सदस्य मंगलादेवी पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:46 AM2021-02-06T04:46:04+5:302021-02-06T04:46:04+5:30

गडहिंग्लज : गडहिंग्लज पंचायत समितीच्या माजी सदस्य मंगलादेवी तात्यासाहेब पाटील (६८, मूळगाव कडलगे, ता. गडहिंग्लज, सध्या रा. संकेश्वर) यांचे ...

Former member of Gadhinglaj Panchayat Samiti Mangaladevi Patil passed away | गडहिंग्लज पंचायत समितीच्या माजी सदस्य मंगलादेवी पाटील यांचे निधन

गडहिंग्लज पंचायत समितीच्या माजी सदस्य मंगलादेवी पाटील यांचे निधन

Next

गडहिंग्लज : गडहिंग्लज पंचायत समितीच्या माजी सदस्य मंगलादेवी तात्यासाहेब पाटील (६८, मूळगाव कडलगे, ता. गडहिंग्लज, सध्या रा. संकेश्वर) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने शुक्रवारी (दि. ५) सकाळी साडेआठच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिवंगत टी. आर. पाटील यांच्या त्या पत्नी तर बँकेचे विद्यमान संचालक संतोष पाटील-कडलगेकर व प्रगतशील शेतकरी सचिन पाटील यांच्या त्या मातोश्री होत. कडलगे येथील श्री मल्लिकार्जुन नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षा म्हणून त्या काम पाहात होत्या.

दुपारी ४ वाजता कडलगे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कर्नाटकचे माजी मंत्री अ‍ॅड. ए. बी. पाटील, माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. माती सावडण्याचा कार्यक्रम रविवारी (दि. ७) सकाळी ९ वाजता आहे.

----------------------------------

* मंगलादेवी पाटील : ०५०२२०२१-गड-०९

Web Title: Former member of Gadhinglaj Panchayat Samiti Mangaladevi Patil passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.