नवीन इमारतीसाठी आजी-माजी आमदारांनी एकत्र यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 12:47 AM2017-10-07T00:47:36+5:302017-10-07T00:48:55+5:30

कसबा बावडा : करवीर पंचायत समितीची नवीन इमारत होण्यासाठी तालुक्यातील आजी-माजी आमदारांनी एकत्र येऊन व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट घेऊन इमारतीचा प्रश्न सोडवावा

 Former MLAs should come together for the new building | नवीन इमारतीसाठी आजी-माजी आमदारांनी एकत्र यावे

नवीन इमारतीसाठी आजी-माजी आमदारांनी एकत्र यावे

Next
ठळक मुद्दे करवीर पंचायत समिती सभेत मागणी : विविध प्रश्नांवर जोरदार चर्चागेल्या सभेत तालुक्यातील ग्रा.पं.ना बायोमेट्रिक बसविण्याचा निर्णय झाला होता; सभागृहात जोरदार चर्चा झाली. अधिकाºयांनी दिलेल्या उत्तरावर सदस्यांचे समाधान झाले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क
कसबा बावडा : करवीर पंचायत समितीची नवीन इमारत होण्यासाठी तालुक्यातील आजी-माजी आमदारांनी एकत्र येऊन व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट घेऊन इमारतीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी करवीर पंचायत समितीच्या शुक्रवारी झालेल्या मासिक सभेत सदस्यांनी एकमताने केली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती प्रदीप झांबरे होते. उपसभापती विजय भोसले, गटविकास अधिकारी एस. एस. घाटगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

करवीर पं.स.च्या कामकाजाचा पसारा इतर समितींच्या पटीत खूप जास्त आहे. सध्या पत्र्याच्या एकूण चार शेडवजा इमारतीतून समितीचा कारभार सुरू आहे. या इमारतीत काही दुरुस्ती करायची म्हटली तरी जागा मालकांची परवानगी लागते. गेले सहा महिने सभागृहातील वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याने इमारतीच्या प्रश्नाला सभेत पुन्हा वाचा फुटली.

सभापतींनी गेल्या सभेत महिन्याभरात वातानुकूलित यंत्रणा रद्द केली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले? असा प्रश्न चंद्रकांत पाटील, इंद्रजित पाटील, रमेश चौगले यांनी विचारला. यावर सभापती झांबरे यांनी संपूर्ण वायरिंग बदलावी लागते. ती बदलायचे झाल्यास परवानगी मिळत नसल्याचे स्पष्ट केले. इमारत भाड्याने असेल आणि याठिकाणी काही दुरुस्ती करता येत नसेल, तर नवीन इमारत बांधा. नवीन इमारतीसाठी शिवसेना, भाजप सदस्यांचा पाठिंबा राहील, असे इंद्रजित पाटील यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील व दक्षिणमधील सर्व आजी-माजी आमदारांना एकत्र करून, तसेच पालकमंत्री चंद्रकांतदादा यांची भेट घेऊन या इमारतीचा प्रश्न सोडविण्याचा निर्णय झाला. सभापती झांबरे यांनी यासाठी लवकरच बैठक घेतली जाईल, असे स्पष्ट केले.

गेल्या सभेत तालुक्यातील ग्रा.पं.ना बायोमेट्रिक बसविण्याचा निर्णय झाला होता; परंतु अद्यापही पूर्तता झाली नाही. यानिषेधार्थ आजपासून प्रत्येक सभेत जमिनीवर बसूनच सहभाग घेणार असल्याचा निर्धार सुनील पोवार यांनी जाहीर केला; परंतु गटविकास अधिकारी एस. एस. घाटगे, सभापती झांबरे यांनी त्यांची समजूत काढून हा निर्णय मागे घ्यायला लावला. सभागृहात विचारलेल्या प्रश्नांचे पुढे काय होते ते समजत नाही, असे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले. अंगणवाडी कर्मचाºयांचा पगार वेळेत होत नाही, अशी तक्रार सविता पाटील यांनी केली. विविध विभागांकडील कामावर हजर किंवा गैरहजर कर्मचारी समजत नसल्याने हालचाल रजिस्टर ठेवा, अशी मागणी अविनाश पाटील यांनी केली.

महे ग्रा. पं.मध्ये गेले दोन महिने ग्रामसेवक नाहीत, अशी तक्रार अश्विनी धोत्रे यांनी केली. खुपिरे येथील शालेय पोषण आहारात अळ्या सापडल्या. त्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी राजेंद्र सूर्यवंशी यांनी केली. सभेत यशोदा पाटील, सरिता कटेजा, शोभा राजमाने, मंगल पाटील, मीनाक्षी पाटील, अर्चना खाडे, सविता पाटील, अश्विनी धोत्रे, मोहन पाटील यांनी चर्चेत भाग घेतला. प्रारंभी माजी सभापती पी. डी. पाटील, तसेच डॉ. डी. वाय. पाटील यांच्या मातोश्री सुलाबाई पाटील यांच्या निधनाबद्दल सभेत श्रद्धांजली वाहिली. उपसभापती विजय भोसले यांनी आभार मानले.

पंचायतमध्ये चाललाय आंधळा कारभार
करवीर पंचायतमध्ये सभेत विचारलेल्या प्रश्नांना नीट उत्तरे मिळत नाहीत. कोण कामावर आहे, कोण कामावर नाही? हे कळत नाही. सगळा आंधळा कारभार चालला आहे, अशा शब्दांत सभापती प्रदीप झांबरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.पावसाळ्यातलोडशेडिंग का?पावसाळा सुरू असताना तालुक्यात वारंवार लोडशेडिंग का? असा सवाल रमेश चौगले यांनी वीज महामंडळाच्या अधिकाºयांना विचारला. या प्रश्नावर सभागृहात जोरदार चर्चा झाली. अधिकाºयांनी दिलेल्या उत्तरावर सदस्यांचे समाधान झाले नाही.

 

 

Web Title:  Former MLAs should come together for the new building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.