Kolhapur: ..त्यामुळे मुश्रीफ साहेब आता तुम्ही थांबाच?, विरेंद्र मंडलिक यांचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 03:02 PM2024-10-08T15:02:42+5:302024-10-08T15:03:48+5:30

समरजित घाटगे यांच्यावरही टीका

Former MP Sanjay Mandlik son Virendra Mandlik has claimed candidacy against Hasan Mushrif from Kagal Assembly Constituency | Kolhapur: ..त्यामुळे मुश्रीफ साहेब आता तुम्ही थांबाच?, विरेंद्र मंडलिक यांचे आवाहन 

Kolhapur: ..त्यामुळे मुश्रीफ साहेब आता तुम्ही थांबाच?, विरेंद्र मंडलिक यांचे आवाहन 

दत्ता पाटील 

म्हाकवे : कागलविधानसभा मतदारसंघात मुश्रीफसाहेब यांना उमेदवारी दिल्यास अँन्टी इन्कम्बंसीचा फटका महायुतीला बसू शकतो. दहा पैकी आठ मतदार मुश्रीफसाहेब नको म्हणतात त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली तर महायुतीचेच नुकसान होणार आहे. त्यामुळे मुश्रीफसाहेब तुम्ही आता  थांबावे असे आवाहन शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र युवा सेना निरीक्षक विरेंद्र मंडलिक यांनी केले. लोकसभेला कागल तालुक्यातील घटलेल्या मतदानाला जबाबदार धरत मुश्रीफांसह समरजित घाटगे यांच्यावर टीकेची झोड उडवली.

बामणी फाटा ता. कागल येथे शिवसेना युवासेना पदाधिकारी निवडीच्या निमित्ताने आयोजित भगवा मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुरगूडचे माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके होते.
कागल ही शिवसेनेचीच नैसर्गिक जागा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर मी कागल विधानसभा लढविण्यासाठी तयार आहे. वडील की ज्या नात्याने आणि मंडलिक साहेबांनी केलेल्या उपकाराची परतफेड करण्यासाठी त्यांच्या नातवाला विधानसभेला संधी द्यावी. अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

समरजित घाटगे यांच्यावरही टीकास्त्र सोडत विरेंद्र मंडलिक म्हणाले, लोकसभेच्या तोंडावर घाटगे यांनी राजे विरुद्ध जनक घराणे म्हणत आपल्याला उमेदवारी मागितली. त्यामुळे पंधरा दिवस वेळ गेला. तर प्रचारातही राजेंनाच मदत केली. 

..तुमचे अगोदरच ठरले होते का?

संजय घाटगे यांनी लोकसभेत महायुतीच्या पराभवासाठी प्रयत्न केले. मात्र निवडणूक होताच पंधरा दिवसात संजय घाटगे यांचा मुश्रीफ यांना पाठिंबा. तर मुश्रीफ यांनीही त्यांना बँकेत स्वीकृत संचालक म्हणून बक्षीस दिले. हे उबाठाच्या नेत्यांना कसे चालते. आणि लोकसभेत पराभव करण्याचे तुमचे अगोदरच ठरले होते का? असा सवालही मंडलिक यांनी केला.

Web Title: Former MP Sanjay Mandlik son Virendra Mandlik has claimed candidacy against Hasan Mushrif from Kagal Assembly Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.