मसोलीत गड आला...पण सिंह गेला..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:32 AM2021-06-16T04:32:01+5:302021-06-16T04:32:01+5:30
पेरणोली : कोरोनातून वडील बरे झाले; मात्र मुलग्याला जीव गमाविण्याची वेळ आली. त्यामुळे ‘सिंह आला, पण गड’ गेल्याचा अनुभव ...
पेरणोली : कोरोनातून वडील बरे झाले; मात्र मुलग्याला जीव गमाविण्याची वेळ आली. त्यामुळे ‘सिंह आला, पण गड’ गेल्याचा अनुभव मसोली (ता. आजरा) येथील गुरव कुटुंबीयावर आला आहे. येथील सचिन दादू गुरव (वय ३८) कोरोनाबाधित आले. त्यानंतर त्यांचे वडील दादू शंकर गुरव (वय ६५) हेदेखील बाधित झाले. वडील आजरा कोविड सेंटरमध्ये उपचार घेत होते. तर सचिन गडहिंग्लजमधील खासगी रुग्णालयात उपचार घेत होता.
आजारामधून वडील बरे झाले आणि सचिनवर उपचार सुरू झाले. उपचारातून सचिनही बरा झाला. रिपोर्टही निगेटिव्ह आला होता. दरम्यान, अचानक सचिनची तब्येत खालावली आणि ऑक्सिजन कमी झाल्यामुळे शनिवार (दि. १२) सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.
अवघ्या ३८व्या वर्षी सचिनला जगाचा निरोप घ्यावा लागला. प्रामाणिक, मनमिळावू, सतत मदतीचा हात पुढे देणारा म्हणून परिचित होता.
ग्रामपंचायतीत परिवर्तन घडवून सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले होते. त्याच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
--------------------------
* दु:खाचा डोंगर
सचिन हा आजरा अर्बन बँकेत नोकरीस होता. काही वर्षांपूर्वी आई व भावाचे निधन झाले आहे. त्यानंतर स्वत: सचिन या कर्ता पुरुषाच्या जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
--------------------------
* सचिन गुरव : १४०६२०२१-गड-०७