भुदरगड तालुक्यातील पंचेचाळीस ग्रा. पं. च्या निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:23 AM2020-12-24T04:23:44+5:302020-12-24T04:23:44+5:30
गतविधानसभा निवडणुकीत बहुरंगी उमेदवारीने चर्चेत आलेल्या या तालुक्यात सगळे पक्ष सगळे नेते एकवटलेले असताना विद्यमान आमदार आबिटकर यांनी दिलेली ...
गतविधानसभा निवडणुकीत बहुरंगी उमेदवारीने चर्चेत आलेल्या या तालुक्यात सगळे पक्ष सगळे नेते एकवटलेले असताना विद्यमान आमदार आबिटकर यांनी दिलेली एकाकी लढत ही विरोधकांच्या छातीत धडकी भरवणारी ठरली. गावागावांत राष्ट्रवादीचा गट प्रबळ आहे पण त्याला शह देण्यासाठी आमदार आबिटकर,राहुल देसाई यांनी व्यूहरचना केली आहे. भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जोर लावला आहे. काही ठिकाणी काँग्रेस सचिन घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली नव्याने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
या तालुक्यात मतदार सूज्ञ आणि साक्षर भूमिका बजावत असल्याने प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळे निकाल पाहायला मिळतात. या तालुक्यात गटातटांच्या राजकारणाला मतदारांनी तिलांजली दिल्याने बहुसंख्य ग्रामपंचायतीवर कोणाची निर्विवाद सत्ता येईल हे सांगणे कठीण आहे. गावपातळीवर जमवाजमव करून सोयीच्या स्थानिक आघाड्या करण्यावर स्थानिक नेत्यांचा भर आहे. अनेक ठिकाणी बिनविरोध ग्रामपंचायत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत पण याला कितपत प्रतिसाद मिळतो हे माघारीनंतर समजेल.
खानापूर, गंगापूर, म्हसवे, या गावांसह अनेक गावांतील निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती
आंबवणे,खानापूर, कलनाकवाडी, सालपेवाडी, गंगापूर,पळशिवणे, फणसवाडी,आदमापुर, पंडिवरे,नवरसवाडी, लोटेवाडी, नाधवडे,बसरेवाडी, मिणचे खुर्द,नितवडे, दोनवडे,पाचर्डे, मोरेवाडी, म्हसवे,नांगरगाव,भेंडवडे,नागणवाडी, हेळेवाडी,पांगीरे, बामणे,बारवे, मुरूकटे,बेगवडे,बेडीव,तांब्याचीवाडी, पाटगाव,नवले,ममदापूर, शिवडाव,पाळ्याचा हुड्डा,वासणोली, मेघोली, सोनूर्ली या अडतीस स्वतंत्र ग्राप आणि
सात ग्रुप ग्रामपंचायती
बिद्री- पेठशिवापूर, मठगाव -मानी, म्हासरंग- उकिरभाटले, भालेकरवाडी - थड्याचीवाडी, नांदोली -करंबळी, डेळे - चिवाळे, एरंडपे -खेडगे
एकूण मतदारसंख्या
पुरुष - २४१७६
स्त्री - २२८३०
मतदानकेंद्र संख्या १३६