मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा, टेंबलाई नाका येथील लहान मुलांचा वादातून प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:23 PM2017-11-18T12:23:49+5:302017-11-18T12:26:28+5:30

टेंबलाई नाका झोपडपट्टी येथे किरकोळ वादातून दाम्पत्यास चौघांनी बेदम मारहाण केली. अकिल उमर शेख (वय ३५) व त्यांची पत्नी अशी जखमींची नावे आहेत. राजारामपूरी पोलीसांनी संशयित हौसा कसबेकर, सारीका दत्तात्रय कसबेकर, उमा कसबेकर व सारीकाचा भाऊ यांचेवर गुन्हा दाखल केला. ही घटना गुरुवारी (दि. १६) रात्री घडली.

The four accused in the assault case, the accused from Tembali Naka, | मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा, टेंबलाई नाका येथील लहान मुलांचा वादातून प्रकार

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा, टेंबलाई नाका येथील लहान मुलांचा वादातून प्रकार

Next
ठळक मुद्देटेंबलाई नाका झोपडपट्टीत दाम्पत्यास चौघांकडून बेदम मारहाण लहान मुलांचा किरकोळ वादातून प्रकार

कोल्हापूर : टेंबलाई नाका झोपडपट्टी येथे किरकोळ वादातून दाम्पत्यास चौघांनी बेदम मारहाण केली. अकिल उमर शेख (वय ३५) व त्यांची पत्नी अशी जखमींची नावे आहेत.

राजारामपूरी पोलीसांनी संशयित हौसा कसबेकर, सारीका दत्तात्रय कसबेकर, उमा कसबेकर व सारीकाचा भाऊ यांचेवर गुन्हा दाखल केला. ही घटना गुरुवारी (दि. १६) रात्री घडली.


अधिक माहिती अशी, अकिल व हौसा कसबेकर हे एकमेकांचे शेजारी राहण्यास आहेत. गेल्या सहा महिन्यापासून त्यांचेत किरकोळ वादावादी आहे. दि. १६ रोजी शेख यांची मुले कसबेकर यांच्या दारात खेळत होती.

यावेळी हौसा कसबेकर यांनी शेख यांच्या पत्नीस शिवीगाळ करु नका असे म्हणत लाथाबुक्यांनी मारहाण केली. पत्नीला सोडविण्यास शेख गेले असता त्यांच्या डोक्यात फरशी मारुन जखमी केले.

त्यांचेवर सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
 

Web Title: The four accused in the assault case, the accused from Tembali Naka,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.