हालशुगरचे साडेचार लाख टन गाळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:23 AM2021-03-06T04:23:33+5:302021-03-06T04:23:33+5:30
निपाणी : निपाणी येथील श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याने २०२०-२१ सालच्या गळीत हंगामात ४ लाख ३४ हजार ७१० मेट्रिक ...
निपाणी : निपाणी येथील श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याने २०२०-२१ सालच्या गळीत हंगामात ४ लाख ३४ हजार ७१० मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले असून, ५ लाख १५ हजार ३०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तसेच शेकडा उतारा ११.८५ इतका आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
दिनांक ३० ऑक्टोबर २०२०पासून हालशुगरचा गळीत हंगाम सुरू झाला होता. २७ फेब्रुवारी २०२१ रोजी कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता झाली आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासद, बिगर सभासद यांनी नोंदणी केलेला ऊस गाळप केला आहे. तसेच ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा अपुरी पडल्यामुळे आम्ही नोंद केलेला ऊस शेजारील कारखान्यांनी गाळप केला आहे. हंगामात पाच लाख टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट गाठता आले नाही तरीसुद्धा कठीण परिस्थितीवर मात करत चार लाख ३४ हजार ७१० मेट्रिक टन ऊसाचे गाळप कारखान्याच्या इतिहासात प्रथमच केल्याचे कोठीवाले यांनी म्हटले आहे.