जारकीहोळी सीडीचा तपास एसआयटीकडे, चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:22 AM2021-03-14T04:22:17+5:302021-03-14T04:22:17+5:30

'सीडी' प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नव्याने स्थापन झालेल्या एसआयटीने शुक्रवारी कन्नड टीव्हीच्या पत्रकारांना चौकशीत हजर राहण्यास सांगितले होते. प्रसारमाध्यमांना पुरविण्यात ...

Four arrested in Sarki probe | जारकीहोळी सीडीचा तपास एसआयटीकडे, चौघांना अटक

जारकीहोळी सीडीचा तपास एसआयटीकडे, चौघांना अटक

Next

'सीडी' प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नव्याने स्थापन झालेल्या एसआयटीने शुक्रवारी कन्नड टीव्हीच्या पत्रकारांना चौकशीत हजर राहण्यास सांगितले होते. प्रसारमाध्यमांना पुरविण्यात आलेल्या व्हिडिओ क्लिपचा स्रोत शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी पहिल्याच दिवशी दिनेश कल्लहळ्ळीला सीडी देणाऱ्याला यशवंतपूरमधील एकाला अटक केली. सौमेंद्र मुखर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीमने सीडी देणाऱ्या एका व्यक्तीसह तिघांना चामराजपेठ, विजयनगर, रामनगर येथून अटक करत तपास सुरू केला आहे.

तत्पूर्वी, गृहमंत्री बसवराज बोम्माई यांच्या निर्देशानंतर बंगलोर शहर पोलीस आयुक्त कमल पंत यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त (पश्चिम) सौमेंदू मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन केली. एसआयटी टीममध्ये सीसीबीचे सहआयुक्त संदीप पाटील, सीसीबीचे डीसीपी रविकुमार, डीसीपी (मध्य) अनुचेत आणि एसीपी धर्मेंद्र याशिवाय सीसीबी निरीक्षक आणि कबन पार्क पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांचा समावेश आहे. मुखर्जींना त्यांच्या पथकात इतर कोणत्याही अधिकाऱ्यांचा समावेश करण्यासाठी मुभा देण्यात आल्याची माहिती आहे. तथापि, एसआयटी स्थापन करण्याच्या कमल पंत यांच्या ११ मार्चच्या आदेशात कोणत्याही प्रकारचे एफआयआर नोंदविण्याचे किंवा कोणत्याही व्यक्तीला अटक करण्याचे कोणतेही अधिकार दिलेले नाहीत.

Web Title: Four arrested in Sarki probe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.