मद्य, गुटखा विक्री करणाऱ्या चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:22 AM2021-03-14T04:22:35+5:302021-03-14T04:22:35+5:30

येथील वडगाव बाजार समितीसमोर शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बेकायदेशीररीत्या देशी-विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या एकास गावभाग पोलिसांंनी अटक केली. ...

Four arrested for selling liquor, gutkha | मद्य, गुटखा विक्री करणाऱ्या चौघांना अटक

मद्य, गुटखा विक्री करणाऱ्या चौघांना अटक

googlenewsNext

येथील वडगाव बाजार समितीसमोर शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बेकायदेशीररीत्या देशी-विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या एकास गावभाग पोलिसांंनी अटक केली. विलास बाबूराव गायकवाड (वय ६०, रा. संगमनगर, तारदाळ) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून देशी-विदेशी मद्याच्या एकूण १८० बाटल्या, दुचाकी (एमएच ०९-ई.सी. ५८८२) असा ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच बेकायदेशीररीत्या बिअर वाहतूक करताना निरामय हॉस्पिटलसमोरील मार्गावरून केतन गोविंद होगाडे (३८, रा. पल्लवी हॉटेलजवळ) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील १२ बिअरच्या बाटल्या आणि दुचाकी असा ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सांगली रोडवरील पाटील मळ्यात गुटखा विक्री करणाऱ्या श्रीकांत आप्पासाहेब बेडगे (३४) याला छापा टाकून अटक केली. त्याच्याकडून सुगंधी तंबाखू, पानमसाला असा सुमारे साडेसहा हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तर त्याच भागातील अप्पासाहेब रामचंद्र बेडगे याला देशी दारू विक्री करताना ताब्यात घेतले. त्याच्याकडूनही देशी दारूच्या सुमारे १४०० रुपयांच्या ५१ बाटल्या जप्त केल्या. या कारवाईत राम पाटील, आरिफ वडगावे, बबन माळी सहभागी झाले होते.

याबाबत गावभाग पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

Web Title: Four arrested for selling liquor, gutkha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.