परजिल्ह्यांतील नागरिकांच्या समन्वयासाठी चार समन्वय अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 01:26 PM2020-05-11T13:26:55+5:302020-05-11T13:29:10+5:30
विभागीय कार्यालय क्रमांक ३, जगदाळे हॉल अंतर्गत येणाऱ्या प्रभागासाठी साहाय्यक आयुक्त अवधूत कुंभार, विभागीय कार्यालय क्रमांक ४ ताराराणी मार्केट अंतर्गत येणाऱ्या प्रभागासाठी करनिर्धारक व संग्राहक संजय भोसले यांची नियुक्ती केली आहे.
कोल्हापूर : लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अडकलेले विद्यार्थी, यात्रेकरू, पर्यटक, मजूर कामगार यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यास शासनाने सशर्त परवानगी दिलेली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्याच्या इतर जिल्ह्यांमधून व विविध राज्यांतून नागरिक कोल्हापूर शहरामध्ये मोठ्या संख्येने येत आहेत. कोल्हापूर शहरामध्ये येणाऱ्या नागरिकांच्या नियोजनासाठी रविवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी चार अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारीह्ण म्हणून नियुक्ती केली.
विभागीय कार्यालय क्रमांक १ गांधी मैदानअंतर्गत येणाऱ्या प्रभागासाठी मुख्य लेखापाल संजय सरनाईक, विभागीय कार्यालय क्रमांक २ शिवाजी मार्केट अंतर्गत येणाऱ्या प्रभागासाठी साहाय्यक आयुक्त चेतन कोंडे, विभागीय कार्यालय क्रमांक ३, जगदाळे हॉल अंतर्गत येणाऱ्या प्रभागासाठी साहाय्यक आयुक्त अवधूत कुंभार, विभागीय कार्यालय क्रमांक ४ ताराराणी मार्केट अंतर्गत येणाऱ्या प्रभागासाठी करनिर्धारक व संग्राहक संजय भोसले यांची नियुक्ती केली आहे.
समन्वय अधिकाऱ्यांची जबाबदारी
शहरामध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची सीपीआर रुग्णालयामध्ये स्वॅब तपासणी करवून घेणे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनुसार त्यांचे घरी अलगीकरण अथवा संस्थात्मक अलगीकरण याबाबत मॉनिटरिंग करणे. संबंधित नागरिकांवर लक्ष ठेवणे.
समन्वय अधिकाऱ्यांनी प्रभाग समितीचे अध्यक्ष, उपशहर अभियंता व प्रभाग सचिव यांच्या संपर्कात राहून त्या-त्या प्रभागात आलेल्या नागरिकांची माहिती उपलब्ध करून देणे.