भारत बिल्डर्सकडून व्यापाऱ्याची चार कोटींची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 02:46 AM2019-11-21T02:46:52+5:302019-11-21T02:47:54+5:30

तेरा जणांवर गुन्हा दाखल

Four crore crores of fraud by India Builders | भारत बिल्डर्सकडून व्यापाऱ्याची चार कोटींची फसवणूक

भारत बिल्डर्सकडून व्यापाऱ्याची चार कोटींची फसवणूक

Next

कोल्हापूर : कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकाजवळील जेम्स स्टोन्स या व्यापारी संकुलातील दुकानगाळे खरेदी देतो, असे सांगून व्यापारी सुरेश भगवानदास आहुजा (रा. सिद्धीविनायक क्लासिक अपार्टमेंट, महालक्ष्मी कॉलनी, हिम्मतबहादूर परिसर कोल्हापूर) यांची चार कोटी अकरा लाख छप्पन हजार सहाशे छप्पन रुपयांची संगनमताने फसवणूक केल्याबद्दल भारत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भारत उद्योग लिमिटेड (पूर्वीची जयहिंद कॉन्ट्रॅक्ट लि.,) या कंपनीचे चेअरमन व कार्यकारी संचालक श्रीचंद राजाराम कुकरेजा व वाशी (नवी मुंबई) येथील करूर वैश्य बँकेचे शाखाधिकारी यांच्यासह एकूण तेराजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. अन्य आरोपी संचालकांची नावे आशा श्रीचंद कुकरेजा, सूर्यकांत श्रीचंद कुकरेजा, अन्वेशा श्रीचंद कुकरेजा, जयप्रकाश श्रीचंद कुकरेजा (चौघेही रा. नेरूळ, नवी मुंबई), जयकिशन गुमानसिंग मूलचंदानी (रा. वाशी, नवी मुंबई ), सुजितकुमार दिनानाथ राय (रा. बेलापूर, नवी मुंबई), हरिराम राजाराम कुकरेजा (रा. उल्हासनगर, मुंबई), अशोक राजाराम कुकरेजा, दीपक राजाराम कुकरेजा (दोघेही रा. नेरुळ, नवी मुंबई), महेश राजाराम कुकरेजा (रा. साडपाडा नवी मुंबई) अशी आहेत.

कोल्हापुरातील महापालिकेच्या मालकीची मध्यवर्ती बसस्थानकाजवळील सि.स.नं. ५१७ /२ ही मिळकत विकसित करण्यासाठी ९९ वर्षांच्या कराराने भाडेपट्ट्याने घेतली. या मिळकतीवर जेम्स स्टोन्स नावाचे व्यापारी संकुल उभारले. ते उभारण्यासाठी करूर वैश्य बँकेकडून कर्ज घेतले होते.

Web Title: Four crore crores of fraud by India Builders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.