संततधार पावसाने भुदरगड तालुक्यातील चार बंधारे पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:17 IST2021-06-18T04:17:28+5:302021-06-18T04:17:28+5:30
गारगोटी : गेले दोन दिवस तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वेदगंगा नदीला पूर आला असून गारगोटी, म्हसवे, वाघापूर, निळपण ...

संततधार पावसाने भुदरगड तालुक्यातील चार बंधारे पाण्याखाली
गारगोटी : गेले दोन दिवस तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वेदगंगा नदीला पूर आला असून गारगोटी, म्हसवे, वाघापूर, निळपण हे चार बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. पाटगाव धरण क्षेत्रासह तालुक्यात अतिवृष्टी होत असल्याने वेदगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या चोवीस तासांत २०७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर एक जूनपासून आजपर्यंत ९३६ मि.मी. पावसाची नोंद झाली. पाटगाव येथील विद्युत प्रकल्पाच्या वीजनिर्मितीसाठी २२५ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे भात पिकाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अचानक पाण्याचा जोर वाढल्याने शेतात पाण्याची पातळी वाढून शेतीच्या बांधाचे नुकसान होत आहे.
पाटगाव मध्यम प्रकल्प माहिती
पाणी पातळी ६१८.६८ मीटर
एकूण पाणीसाठा–४७.३४ द.ल.घ.मी (१६७१.८१ द.ल.घ.फू.)
टक्केवारी - ४४.९८%
फोटो ओळ : पाण्याखाली गेलेला म्हसवे बंधारा.