चार दिवसांनंतर धाऊ लागली एसटी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 11:19 AM2017-10-21T11:19:03+5:302017-10-21T11:23:21+5:30
सातव्या वेतन आयोग लागू करण्यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यानी ऐन दिवाळीत पुकारलेला संप अखेर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर मागे घेतल्यानंतर तब्बल चार दिवसानंतर एसटी रस्त्यावरुन धाऊ लागली आहे. यामुळे बहिणींना जणू भाऊबीजेची भेटच मिळाली आहे.
कोल्हापूर, दि. २१ : सातव्या वेतन आयोग लागू करण्यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्या नी ऐन दिवाळीत पुकारलेला संप अखेर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर मागे घेतल्यानंतर तब्बल चार दिवसानंतर एसटी रस्त्यावरुन धाऊ लागली आहे. यामुळे बहिणींना जणू भाऊबीजेची भेटच मिळाली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरवून संप मागे घेण्याचे दिलेल्या आदेशानंतर मध्यरात्री झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे चार दिवसानंतर राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बस आज सकाळपासून रस्त्यावर धावताना दिसू लागल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यानी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मध्यरात्री झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर संप मागे घेण्याचा निर्णय झाल्याने सर्वत्र प्रवासी वगार्तून समाधान व्यक्त होत आहे.