कोल्हापूर जिल्हास्तरीय कला उत्सवात ताराराणी विद्यापीठाच्या चार विद्यार्थिनींचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 06:20 PM2018-11-06T18:20:50+5:302018-11-06T18:26:04+5:30
भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजी येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कलाउत्सवात ताराराणी विद्यापीठाचा झेंडा फडकला.
कोल्हापूर : भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजी येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कलाउत्सवात ताराराणी विद्यापीठाचा झेंडा फडकला.
कमला महाविद्यालयाची विद्यार्थिनी विद्यार्थिनी फिजा खान हिचा गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक आला. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली. याच गायन स्पर्धेत आरती कांबळे हिचाही द्वितीय क्रमांक आला.
उषाराजे हायस्कूलची संगीत विभागाची विद्यार्थिनी दिव्या टोणपे हिचा नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक आला. मुलींमध्ये पहिली आलेल्या दिव्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १५ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत पुण्यात ही राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे.
याशिवाय चित्रकला स्पर्धेत उषाराजे हायस्कूलचीच राजस सुनील पाटील हिचा तिसरा क्रमांक आला. तिला डोंगरसाने आणि कुंभार सर यांचे मार्गदर्शन लाभले.
सलग चौथ्या वर्षी या स्पर्धेत राज्यस्तरीय स्पर्धेत झळकण्याचा मान ताराराणी विद्यापीठाच्या विद्यार्थिनींना मिळाला आहे. गायन आणि नृत्य स्पर्धेसाठी वेशभूषा आणि रंगभूषा सुनंदा पाटील यांनी सांभाळली. गणेश औंधकर याने हार्मोनियमची साथ केली.
राज्यस्तरीय स्पर्धेत सादर झालेल्या जोगवा या नृत्यासाठी नृत्यदिग्दर्शक मदन दाभाडे आणि समृध्दी दाभाडे यांचे मार्गदर्शन लाभले. या संघाला ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील, मुख्याध्यापिका एम.व्ही.जाधव यांच्यासह आझाद नायकवडी यांनी मार्गदर्शन केले.