तनिष्क ज्वेलर्स चोरीप्रकरणी चौघा परप्रांतीयांना अटक, तीन महिलांसह चौघांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 10:34 AM2021-01-07T10:34:50+5:302021-01-07T10:36:54+5:30
Crimenews Kolhapur pune- दसरा चौकातील तनिष्क ज्वेलर्स दुकानातील सोन्याचे दागिने चोरीचा उलगडा पोलिसांनी अवघ्या बारा तासात केला. शाहूपुरीतील एका हॉटेलवर छापा टाकून चौघा परप्रांतीयांना अटक केली. त्यामध्ये एका पुरुषासह तीन महिलांचा समावेश आहे. संशयितांनी कोल्हापूरसह पुण्यातील आणखी दोन तनिष्क ज्वेलर्समध्येही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. तिन्हीही चोरीतील १०५ ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच वापरलेली मोटार असा सुमारे ११ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
कोल्हापूर : दसरा चौकातील तनिष्क ज्वेलर्स दुकानातील सोन्याचे दागिने चोरीचा उलगडा पोलिसांनी अवघ्या बारा तासात केला. शाहूपुरीतील एका हॉटेलवर छापा टाकून चौघा परप्रांतीयांना अटक केली. त्यामध्ये एका पुरुषासह तीन महिलांचा समावेश आहे. संशयितांनी कोल्हापूरसह पुण्यातील आणखी दोन तनिष्क ज्वेलर्समध्येही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. तिन्हीही चोरीतील १०५ ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच वापरलेली मोटार असा सुमारे ११ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
अटक केलेल्यांची नावे : एजाज रियाझ खान (वय ३३, रा. पोस्ट ऑफिस रोड, जि. चिकलपालअबुल रा. कर्नाटक. सध्या रा. बेंगलोर), संजू रवींद्र गुप्ता (३५, रा. बरी तहसिल, जि. कानपूर, उत्तर प्रदेश), सरिता राजाराम शर्मा (२५), आयुषी गुलाब शर्मा (२५, दोघीही रा. रा. रॉबर्टगंज, जि. सोनभद्र, उत्तर प्रदेश. सध्या रा. बोरीवली वेस्ट, मुंबई).
मंगळवारी दुपारी रिक्षातून आलेल्या तीन महिला ग्राहकांनी कोल्हापुरात दसरा चौकातील तनिष्क ज्वेलर्स दुकानात जाऊन सोने खरेदीच्या बहाण्याने सेल्समनची नजर चुकतून ३७ ग्रॅम ७०० मि.लि. वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या लंपास केल्या होत्या.
ज्वेलर्स दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलिसांनी रिक्षाचालकाला शोधून संशयित कोठे रिक्षात बसले, कोठे उतरले याची माहिती मिळवली. पोलिसांनी मध्यरात्रीच शाहूपुरी, बेकर गल्लीतील हॉटेलवर छापा टाकला. त्यात तीन महिलांसह चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील पर्समध्ये चोरीच्या सुमारे १०५ ग्रॅमच्या सोन्याच्या सहा बांगड्या मिळाल्या, गुन्ह्यात वापरलेली मोटारही पोलिसांनी जप्त केली.
पुण्यातील दोन तनिष्क ज्वेसर्लमध्येही चोरी
संशयितांनी कोल्हापुरात येण्यापूर्वी पुण्यातील तसेच पुणे-नगर रोडवरील अशा दोन तनिष्क ज्वेलर्समध्येही मंगळवारी सकाळीच चोरी केल्याचे निष्पन्न झाले. संशयित शिर्डी येथेही गेले, पण तेथून चोरीची कोणतीही तक्रार नसल्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.
तपासाचे शिलेदार
स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पो. नि. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो. नि. सत्यराज घुले, पोलीस चंदू नन्नवरे, सचिन गुरखे, नितीन चैथे, वसंत पिंगळे, सोमराम पाटील, रवींद्र पाटील, संजय पडवळ, वैशाली पाटील, सुप्रिया कात्रट.