भरधाव वेगाने केला घात, संकेश्वर येथे दुचाकी अपघातात चौघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 07:21 PM2022-02-25T19:21:08+5:302022-02-25T19:34:08+5:30

संकेश्वर :  राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या सेवा रस्त्यावरून दुचाकी घसरून झालेल्या अपघातात चौघे तरुण ठार झाले. बसवराज अर्जुन माळी (वय ...

Four killed in Sankeshwar accident | भरधाव वेगाने केला घात, संकेश्वर येथे दुचाकी अपघातात चौघे ठार

भरधाव वेगाने केला घात, संकेश्वर येथे दुचाकी अपघातात चौघे ठार

Next

संकेश्वर :  राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या सेवा रस्त्यावरून दुचाकी घसरून झालेल्या अपघातात चौघे तरुण ठार झाले. बसवराज अर्जुन माळी (वय २६) प्रवीण कल्लापा सनदी (२५) मेहबूब सय्यद शेगडी (२६, सर्व रा. अनंत विद्यानगर, संकेश्वर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, मलिकजान जमादार (२५, रा.खंजर गल्ली, बेळगाव) याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. गुरुवारी (दि. २४) रात्री बाराच्या सुमारास पर्वतराव यांच्या पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला.

अधिक माहिती अशी, मेहबूब व मलिकजान हे दोघे मामे भाऊ होत. मलिकजान हा बेळगावहून संकेश्वरला नातेवाइकांकडे आला होता. गुरुवारी रात्री बसवराजच्या  दुचाकीवरून(केए २३ एस ७२५६ ) प्रवीण, मेहबूब आणि मलीकजान हे चौघेही काही कामानिमित्त एकाच दुचाकीवरून निपाणीला गेले होते.

निपाणीहून संकेश्वरला  येत असताना संकेश्वरनजीक महामार्गावरून सेवा रस्त्यावर आल्यावर पर्वतराव  यांच्या पेट्रोल पंपाजवळ त्यांची भरधाव  दुचाकी रस्त्यावरून घसरली. त्यामुळे बसवराज, प्रविण आणि मेहबूब रस्त्यावर जोरात आपटले.डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिघांचा जागीच मृत्यु झाला.

दरम्यान, दुचाकीवरून बाहेर फेकला गेल्याने पाठीमागे बसलेला मलिकजानही गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी बेळगावच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी (२५) सकाळी दहाच्या सुमारास त्याचाही मृत्यु झाला.

अपघाताचे वृत्त समजताच नातेवाईकांसह  मित्रमंडळींनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. पोलिस निरीक्षक प्रल्हाद चनगिरी यांनी घटनास्थळी भेट दिली. मोहम्मद रसूल किल्लेदार यांच्या वर्दीवरून संकेश्वर पोलीसात अपघाताची नोंद झाली. पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Four killed in Sankeshwar accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.