कोल्हापूरच्या चौघी राष्ट्रीय फुटबाॅल स्पर्धेत खेळणार; महाराष्ट्र राज्य ज्युनिअर गर्ल्स फुटबाॅल संघ जाहिर

By सचिन भोसले | Published: September 16, 2023 09:41 PM2023-09-16T21:41:23+5:302023-09-16T21:44:50+5:30

या निवडीसाठी वेस्टर्न इंडिया फुटबाॅल असोसिएशनतर्फे निवड चाचणी मुंबईत घेण्यात आली होती.

Four of Kolhapur girls will play in the national football tournament; Maharashtra State Junior Girls Football Team Announced | कोल्हापूरच्या चौघी राष्ट्रीय फुटबाॅल स्पर्धेत खेळणार; महाराष्ट्र राज्य ज्युनिअर गर्ल्स फुटबाॅल संघ जाहिर

राज्य ज्युनिअर ग्र्ल्स फुटबाॅल संघात निवड झालेल्या श्रृतिका सुर्यवंशी, प्रतिक्षा नलवडे, सानिका भोसले, आदिती ढेरे

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनच्या सानिका भोसले (कर्णधार), प्रतिक्षा नलवडे, श्रृतिका सुर्यवंशी, आदिती ढेरे या चौघींचा महाराष्ट्र राज्य ज्युनिअर गर्ल्स फुटबाॅल संघात शनिवारी निवड झाली. या चौघी ओडिसा (भूवनेश्वर) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत राज्य संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
या निवडीसाठी वेस्टर्न इंडिया फुटबाॅल असोसिएशनतर्फे निवड चाचणी मुंबईत घेण्यात आली होती.

त्यात या चौघींनीही उत्कृष्ट कामगिरी करीत संघात स्थान पटकाविले. निवड झालेली सानिका ही संजीवनी विद्यानिकेतन (पन्हाळा), तर प्रतिक्षा ही न्यू पाॅलिटेक्निक व श्रृतिका व आदिती ही श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी आहेत. या निवडीसाठी प्रदीप साळोखे, अमित शिंत्रे, रघू पाटील यांनी उत्कृष्ट कामकाज पाहीले. या चौघींना के.एस.ए. पेट्रन इन चिफ शाहू छत्रपती, अध्यक्ष मालोजीराजे, एआयएफएफ महिला समिती सदस्या मधुरिमाराजे, पदाधिकारी माणिक मंडलिक, प्रा. अमर सासने आदींचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

 

Web Title: Four of Kolhapur girls will play in the national football tournament; Maharashtra State Junior Girls Football Team Announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.