बिंदू चौकात चार व्यक्ती पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:24 AM2021-05-18T04:24:46+5:302021-05-18T04:24:46+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात लॉकडाऊन असूनही बिंदू चौक परिसरातून रस्त्यावर फिरणाऱ्यांना पकडून त्यांची मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड अँटिजन चाचणी करण्यात ...

Four persons in point intersection positive | बिंदू चौकात चार व्यक्ती पॉझिटिव्ह

बिंदू चौकात चार व्यक्ती पॉझिटिव्ह

Next

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात लॉकडाऊन असूनही बिंदू चौक परिसरातून रस्त्यावर फिरणाऱ्यांना पकडून त्यांची मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड अँटिजन चाचणी करण्यात आली. या चाचणीत चार व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आले.

शहरात लॉकडाऊन आहे तरीही काही नागरिक विनाकारण घराबाहेर फिरताना आढळत आहेत. अशा नागरिकांची रॅपिड अँटिजन चाचणी केली जात आहे. सोमवारी बिंदू चौकात ३५ नागरिकांची अँटिजन चाचणी करण्यात आली. यापैकी ३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर चार नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

कोल्हापुरातील कोरोना साखळी तोडण्याकरिता या अँटिजन चाचणीचा उपयोग होत आहे. आतापर्यंत अशा चाचणीत आढळलेल्या व्यक्तींना आपण कोरोनाबाधित आहोत याची साधी कल्पनाही नव्हती. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना झाला. अँटिजन चाचणीमुळे अशा संसर्ग फसरवणाऱ्या व्यक्तींवर तातडीने उपचार करण्यातही मदत झाली आहे.

शहरात फिरत असलेल्या महानगरपालिकेच्या पथकाकडून अशी चाचणी करून घेण्यास नागरिक घाबरतात; परंतु चाचणी केल्यानंतर पॉझिटिव्ह असेल तर तातडीने उपचार घेता येतात.

निगेटिव्ह असेल तर मनातील शंकाही दूर होते. संसर्ग रोखण्यात अशी चाचणी उपयोगी पडत आहे.

Web Title: Four persons in point intersection positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.