चार पोलीस स्टेशनला मिळाले तात्पुरते निरीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 11:05 IST2020-11-13T11:03:54+5:302020-11-13T11:05:26+5:30
diwali, padwidharelecation, policeofficers, kolhapurnews दीपावली सण तसेच पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील चार पोलीस ठाण्यांत तात्पुरत्या स्वरूपात पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. हे आदेश गुरुवारी रात्री उशिरा जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी काढले.

चार पोलीस स्टेशनला मिळाले तात्पुरते निरीक्षक
कोल्हापूर : दीपावली सण तसेच पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील चार पोलीस ठाण्यांत तात्पुरत्या स्वरूपात पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. हे आदेश गुरुवारी रात्री उशिरा जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी काढले.
तात्पुरत्या नियुक्ती केलेले पोलीस निरीक्षक : करवीर - संदीप कोळेकर, शाहूवाडी - विजय पाटील, भुदरगड - श्रीकांत कंकाळ, भुदरगड - विकास बडवे.
गेले काही दिवस जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्यांकडे अधिकाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
सध्या दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगार सक्रिय होऊन बंद घरांना लक्ष्य करतात तसेच पदवीधर निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यातील पोलीस स्टेशनच्या चार पोलीस निरीक्षकांच्या रिक्त जागेवर अधिकाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती करण्याचे आदेश अधीक्षक बलकवडे यांनी दिले.