खुनी हल्ला प्रकरणातील चौघांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:20 AM2021-07-17T04:20:51+5:302021-07-17T04:20:51+5:30
इचलकरंजी : कबनूर (ता. हातकणंगले) येथे क्षुल्लक कारणावरून झालेल्या खुनी हल्ल्यातील अटक केलेल्या चौघांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना ...
इचलकरंजी : कबनूर (ता. हातकणंगले) येथे क्षुल्लक कारणावरून झालेल्या खुनी हल्ल्यातील अटक केलेल्या चौघांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणातील संशयित जर्मन टोळीतील असून, दोघे जण रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
शुभम सदाशिव पट्टणकुडे (वय २१), सोन्या ऊर्फ संदीप दुंडाप्पा पाटील (२२), सिद्धू अशोक तळवार (२०, तिघे रा. कबनूर) व शिवा नारायण शिंगे (२०, रा. सहारानगर रुई, ता. हातकणंगले) अशी कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत. यातील तिघांना गुरुवारी (दि.१५) अटक केली होती, तर शिवा हा फरार होता. त्याला रात्री उशिरा शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. कुणाल सुनील सावंत (२०, रा. दत्तनगर, गल्ली नं. ३) याने गुटखा पुडी दिली नसल्याच्या रागातून वरील चौघांनी तलवार हल्ला केला होता.