फटाक्याला फाटा : झोपडपट्टीतील चौघांना मिळाली दिवाळी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 11:20 AM2020-11-14T11:20:33+5:302020-11-14T11:23:12+5:30

फटाके न उडवता त्या पैशांतून शाळेतीलच चारजणांना दिवाळीला कपडे घेण्याची परंपरा याहीवर्षी शिवाजी मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पाळली. कलाशिक्षक मिलिंद यादव यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचे यंदा दहावे वर्ष आहे.

The four from the slums got Diwali gifts | फटाक्याला फाटा : झोपडपट्टीतील चौघांना मिळाली दिवाळी भेट

करवीरचे गटशिक्षण विस्तार अधिकारी विश्वास सुतार प्रमुख पाहुणे होते. सुतार यांच्या हस्ते कपडे देण्यात आले.

Next
ठळक मुद्देझोपडपट्टीतील चौघांना मिळाली दिवाळी भेटशिवाजी मराठाच्या विद्यार्थ्यांनी केली कपड्यांची, धान्याची मदत

कोल्हापूर : फटाके न उडवता त्या पैशांतून शाळेतीलच चारजणांना दिवाळीला कपडे घेण्याची परंपरा याहीवर्षी शिवाजी मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पाळली. कलाशिक्षक मिलिंद यादव यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचे यंदा दहावे वर्ष आहे.

शिवाजी मराठा हायस्कूलचे विद्यार्थी गेली नऊ वर्षे फटाके न उडविण्याची प्रतिज्ञा करतात व त्याच पैशातून गरजू सहकाऱ्याला दिवाळीचे कपडे आणतात. या वर्षी लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत; पण तरीही या चांगल्या कामाची परंपरा खंडित होऊ नये म्हणून याही वेळी या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन फटाक्यांचे पैसे जमा केले. त्यातून चार मुलांना दिवाळीची कपडे व दोन कुटुंबांना एक महिन्याचे धान्य दिले. या शाळेत शिकणारे बहुतेक विद्यार्थी हे गरीब कुटुंबातील, विशेषत: सुधाकर जोशीनगर झोपडपट्टीतच राहतात.

या उपक्रमाचे यंदाचे हे दहावे वर्ष आहे. यावेळी करवीरचे गटशिक्षण विस्तार अधिकारी विश्वास सुतार प्रमुख पाहुणे होते. सुतार यांच्या हस्ते कपडे देण्यात आले. गेली नऊ वर्षे एका शाळेतील मुले फटाके न उडवता, त्याच पैशांतून आपल्या गरजू सहकाऱ्याला दिवाळीचे कपडे आणतात, ही गोष्ट इतर शाळांसाठी आदर्शवत आहे, असे उद्गार यावेळी विश्वास सुतार यांनी काढले.

कलाशिक्षक मिलिंद यादव यांनी प्रास्ताविक केले. प्रणाली जाधव हिने पाहुण्यांची ओळख करून दिली. त्रिशरण गुदगे याने आभार मानले. चंद्रशेखर तुदीगाल, सुमित तुदीगाल, अमोल मोहिते, आदित्य सावंत, घनश्याम पाटील या विद्यार्थ्यांनीच कार्यक्रमाचे नियोजन केले .

शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी दिला हात

यावर्षी या शाळेत शिकून बाहेर पडलेल्या १९९८ च्या बॅचचे विद्यार्थीही या उपक्रमाला सहभागी झाले. बाहेरगावी असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी कोल्हापुरात राहणाऱ्या एका सहकाऱ्याकडे ही रक्कम पाठवून ती मिलिंद यादव यांच्याकडे सुपूर्द केली आहे.
 

Web Title: The four from the slums got Diwali gifts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.