कणेरीवाडीत चोरीच्या चार मोटरसायकली जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:16 AM2021-07-12T04:16:42+5:302021-07-12T04:16:42+5:30

गोकूळ शिरगाव पोलिसांची कारवाई : चोरीच्या चार मोटरसायकली जप्त कणेरी दि.११ शिरोली व गोकूळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ...

Four stolen motorcycles seized in Kaneriwadi | कणेरीवाडीत चोरीच्या चार मोटरसायकली जप्त

कणेरीवाडीत चोरीच्या चार मोटरसायकली जप्त

Next

गोकूळ शिरगाव पोलिसांची कारवाई : चोरीच्या चार मोटरसायकली जप्त

कणेरी दि.११ शिरोली व गोकूळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून १ लाख किमतीच्या चार मोटर सायकलसह चोरट्यांना पकडण्यात गोकूळ शिरगाव पोलिसांना यश आले. याप्रकरणी सागर सातापा शिंदे (वय ३८, रा. माळी गल्ली, कागल) व गुरू किसन पोवार (वय २४, रा. सांगाव रोड, काझी दवाखाना, कागल) यांना दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत चोरीच्या एकूण १४ मोटरसायकल हस्तगत करण्यात गोकूळ शिरगाव पोलिसांना यश आले आहे.

गोकूळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत कणेरीवाडी ब्रिज जवळ पोलीस वाहनचालकांची तपासणी करत होते. यावेळी दोघेजण विना नंबर प्लेटच्या मोटरसायकलवरून आले होते. त्यांच्याकडे गाडीबद्दल चौकशी करत असताना पाठीमागे बसलेला चोरटा पळून जात होता. त्याला पोलीस अंमलदारांनी पकडून चौकशी केली असता गाडी नागाव फाटा येथून चोरी केल्याचे त्याने सांगितले.

कागल पोलीस ठाणाहद्दीतील ३ व शिरोली हद्दीतील १ अशा चार एक लाख रुपये किमतीच्या मोटरसायकली चोरट्यांकडून पोलिसांनी जप्त केल्या. गोकूळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रविकांत गच्चे, प्रणाली पवार, पोलीस हवालदार संतोष तेलंग, प्रदीप जाधव, युवराज कांबळे, राकेश माने, सुहास संकपाळ, नीलेश कांबळे, पोलीस अंमलदार उदय कांबळे, शामराव पाटील, भरत कोरवी यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.

११ गोकूळ शिरगाव पोलीस

फोटो : गोकूळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून संशयितांना मोटरसायकलसह ताब्यात घेतले.

यावेळी सपोनि प्रवीण पाटील, उपनिरीक्षक रविकांत गच्चे, प्रणाली पवार, राकेश माने, बाजीराव पोवार आदी सह पोलीस कर्मचारी

Web Title: Four stolen motorcycles seized in Kaneriwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.