कोल्हापूर-सांगली रस्त्यावर चौघा चोरट्यांनी ट्रकचालकाला लुटले, माणगाव फाट्याजवळ मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:26 PM2017-12-07T12:26:05+5:302017-12-07T12:50:19+5:30

कोल्हापूर-सांगली रस्त्यावर माणगाव फाट्याजवळ रस्त्याकडेला ट्रक उभा करून लघुशंकेस गेलेल्या ट्रकचालकास चाकूचा धाक दाखवून मारहाण करीत चौघा लुटारूंनी लुटले. बाळू सोपान दहीफळे (वय ३०, रा. कोळेवाडी, ता. अहमदपूर, जि. लातूर) असे त्याचे नाव आहे.

Four thieves robbed a truck driver on Kolhapur-Sangli road, near Mangaon ghat | कोल्हापूर-सांगली रस्त्यावर चौघा चोरट्यांनी ट्रकचालकाला लुटले, माणगाव फाट्याजवळ मारहाण

कोल्हापूर-सांगली रस्त्यावर चौघा चोरट्यांनी ट्रकचालकाला लुटले, माणगाव फाट्याजवळ मारहाण

Next
ठळक मुद्देचाकूचा धाक दाखवून मारहाण पाच हजार रुपये, मोबाईल जबरदस्तीने काढून घेत केला पोबारा

कोल्हापूर : कोल्हापूर-सांगली रस्त्यावर माणगाव फाट्याजवळ रस्त्याकडेला ट्रक उभा करून लघुशंकेस गेलेल्या ट्रकचालकास चाकूचा धाक दाखवून मारहाण करीत चौघा लुटारूंनी लुटले. बाळू सोपान दहीफळे (वय ३०, रा. कोळेवाडी, ता. अहमदपूर, जि. लातूर) असे त्याचे नाव आहे.

रोख पाच हजार रुपये, मोबाईल असा सुमारे आठ हजारांचा मुद्देमाल त्याने लंपास केला. हा प्रकार बुधवारी सकाळी सातच्या सुमारास घडला. लुटारूंनी केलेल्या मारहाणीत चालक दहीफळे जखमी झाल्याने त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले.


अधिक माहिती अशी, ट्रकचालक बाळू दहीफळे आपल्या ट्रकमधून धान्य घेऊन इचलकरंजी येथे गेला होता. तेथून तो ट्रक रिकामा करून कोल्हापूरला परत असताना, कोल्हापूर-सांगली रस्त्यावर दत्त स्पिनिंग मिलपासून काही अंतरावर माणगाव फाटा येथे ट्रक रस्त्याकडेला उभा करून लघुशंकेसाठी थांबला.

यावेळी चौघा चोरट्यांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करीत त्याच्या खिशातील पाच हजार रुपये, मोबाईल जबरदस्तीने काढून घेत पोबारा केला. या प्रकारामुळे भांबावलेल्या दहीफळे याने रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांची मदत घेतली. त्यांनी शासकीय रुग्णवाहिका बोलावून त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले.

Web Title: Four thieves robbed a truck driver on Kolhapur-Sangli road, near Mangaon ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.