चार हजार शेतकरी अनुदानाला मुकले ठिबक सिंचनचा घोळ : फॉर्ममधील चुका भोवल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:49 AM2018-10-21T00:49:31+5:302018-10-21T00:50:35+5:30

नसिम सनदी । कोल्हापूर : केवळ फॉर्म भरताना चुका झाल्या म्हणून मागणी केलेल्यांपैकी निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांना ठिबकच्या अनुदानाला मुकावे ...

 Four thousand farmers donated the subsidy to drip irrigation: There are no mistakes in the form | चार हजार शेतकरी अनुदानाला मुकले ठिबक सिंचनचा घोळ : फॉर्ममधील चुका भोवल्या

चार हजार शेतकरी अनुदानाला मुकले ठिबक सिंचनचा घोळ : फॉर्ममधील चुका भोवल्या

Next
ठळक मुद्देपाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीपासून शासनाने ठिबकला झुकते माप दिलेकोणतेच अधिकार जिल्हा पातळीवर नसल्याने राज्यस्तरावर एकत्रित याद्या करताना अपात्र अर्जांचे प्रमाण वाढले.

नसिम सनदी ।
कोल्हापूर : केवळ फॉर्म भरताना चुका झाल्या म्हणून मागणी केलेल्यांपैकी निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांना ठिबकच्या अनुदानाला मुकावे लागले आहे. जिल्ह्णातून ७ हजार ४४७ शेतकºयांनी अर्ज केले होेते, त्यांपैकी ३ हजार ६१३ शेतकºयांनाच प्रत्यक्ष अनुदानाचा लाभ झाला असून, तब्बल ३ हजार ८६१ अर्ज बाद ठरले आहेत.
या शेतकºयांना १0 कोटी ४३ लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे. या रकमेतील शेवटचा ६१ लाखांचा हप्ताही कृषी विभागाकडे आला असून, तो लवकरच शेतकºयांच्या खात्यावर वर्ग होत आहे. ठिबक सिंचनच्या अनुदानाचा आॅनलाईन अर्ज भरण्याबाबतची माहिती शेतकºयांना कृषी विभागाने देण्याची गरज आहे.

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीपासून शासनाने ठिबकला झुकते माप दिले. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून केंद्र ६० टक्के व राज्य ४० टक्के असा अनुदानाचा टक्का ठरवून ३५ टक्के अनुदानावर शेतकºयांना ठिबक संच पुरवण्यास सुरुवात झाली.

अनुदान थेट शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करण्याबरोबरच आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया राबवली. २०१७-१८ या आर्थिक वर्षात या पद्धतीने फॉर्म भरून घेतले. यात कोल्हापूर जिल्ह्णातील ७ हजार ४७४ शेतकºयांनी अर्ज भरले. हातकणंगले, शिरोळ, कागल, करवीर या तालुक्यांतील शेतकºयांचा भरणा जास्त होता.
अर्ज भरण्यासाठी झुंबड उडाली; पण त्यात मोठ्या प्रमाणावर चुका झाल्याने आणि त्यात सुधारणा करण्याचे कोणतेच अधिकार जिल्हा पातळीवर नसल्याने राज्यस्तरावर एकत्रित याद्या करताना अपात्र अर्जांचे प्रमाण वाढले.

बहुतांश शेतकरी डिलरकडूनच अर्ज भरून घेतात. अर्ज इंग्लिशमध्ये असल्याने नावाच्या स्पेलिंगमध्ये चुका राहतात. त्या अन्य ओळखीच्या पुराव्याशी जुळत नाहीत. शिवाय अर्धवट अर्ज भरले जातात. संच बसवण्याआधीच अर्ज भरण्याची घाई केली जाते. २० गुंठ्यांच्या आत अनुदान मिळत नसतानाही अर्ज भरले जातात. या सर्व अज्ञानपणामुळे प्रत्यक्षातील अर्ज आणि अनुदानप्राप्त शेतकरी यांच्या संख्येत निम्म्यापेक्षा अधिक तफावत दिसत आहे.

नव्या वर्षात ६०० अर्ज
मोठ्या प्रमाणावर अर्ज बाद झाल्याने आॅनलाईन अचूक फॉर्म भरण्याविषयी माहिती देण्याची गरज आहे. यावर्षी नोव्हेंबरपासून ही प्रक्रिया अधिक गती घेणार आहेत. आतापर्यंत ६०० शेतकºयांनी अर्ज केले आहेत. मार्चपर्यंत प्रक्रिया सुरू राहणार आहे. शेतकºयांनी अचूक अर्ज भरावेत, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे.


तालुका प्रस्ताव अनुदानप्राप्त
संख्या शेतकरी
आजरा ३0१ १0१
भुदरगड १५६ २४
चंदगड २२७ ३५
गडहिंग्लज ५२४ २३८
गगनबावडा ६८ ३४
हातकणंगले १९४४ ९६२
कागल १0४३ ५२४
करवीर १0३९ ५३८
पन्हाळा ३८५ १८३
राधानगरी १३१ ३८
शाहूवाडी ११७ ५0
शिरोळ १५३९ ८८६

Web Title:  Four thousand farmers donated the subsidy to drip irrigation: There are no mistakes in the form

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.