‘अर्थ अवर’च्या रूपाने चार हजार युनिट विजेची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:23 AM2021-03-28T04:23:26+5:302021-03-28T04:23:26+5:30

कोल्हापूर : पर्यावरणाचा समतोल राहावा आणि विजेची बचत व्हावी, या उद्देशाने कोल्हापूर शहरात शनिवारी सायंकाळी ‘अर्थ अवर’चा उपक्रम ...

Four thousand units of electricity saved in the form of 'Earth Hour' | ‘अर्थ अवर’च्या रूपाने चार हजार युनिट विजेची बचत

‘अर्थ अवर’च्या रूपाने चार हजार युनिट विजेची बचत

Next

कोल्हापूर : पर्यावरणाचा समतोल राहावा आणि विजेची बचत व्हावी, या उद्देशाने कोल्हापूर शहरात शनिवारी सायंकाळी ‘अर्थ अवर’चा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत ३० हजार पथदिवे बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे सुमारे चार हजार युनिट विजेची बचत झाली.

ऐतिहासिक बिंदू चाैकात ‘अर्थ अवर’च्या लोगोच्या पणत्याही प्रज्वलित करून हा उपक्रम साजरा करण्यात आला. या ‘अर्थ अवर’मुळे शहरातील प्रमुख चौकांसह मुख्य रस्त्यांवर काही काळ अंधार होता. या एक तासादरम्यान शहरातील तीस हजार पथदिवे बंद करण्यात आले होते. यातून चार हजार युनिट विजेची बचत झाल्याची माहिती डाॅ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक डाॅ. अनिलकुमार गुुप्ता यांनी दिली. हा उपक्रम डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सृष्टी नेचर क्लब, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय- कसबा बावडा, कोल्हापूर महापालिका, राष्ट्रीय सेवा योजना, शिवाजी विद्यापीठ, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स, कार्बन न्यूट्रल कोल्हापूर २०२५, नाॅर्थ फौंडेशन, महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ यांच्या सहसंयोजनाने शनिवारी रात्री साडेसात ते साडेआठ या दरम्यान झाला.

यावेळी प्राचार्य डाॅ. संतोष चेडे, एन. एस. एस. समन्वयक डाॅ. पी. डी. चौगुले, जिमखाना प्रमुख डाॅ. राजेंद्र रायकर, डाॅ. ए. ए. राठोड, डाॅ. पी. एन. गायकवाड, डाॅ. राहुल पाटील यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

फोटो : २७०३२०२१-कोल-अर्थ अवर

आेळी : डाॅ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे शनिवारी सायंकाळी साडेसात ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास ‘अर्थ अवर’ उपक्रमाअंतर्गत शहरातील पथदिवे बंद ठेवण्यात आले होते. त्यानिमित्त शहरातील सर्वाधिक वाहतुकीच्या स्टेशन रोडवर असे चित्र होते.

छाया : आदित्य वेल्हाळ

===Photopath===

270321\27kol_4_27032021_5.jpg

===Caption===

फोटो : २७०३२०२१-कोल-अर्थ अवर आेळी : डाॅ. डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे शनिवारी सायंकाळी साडेसात ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास ‘अर्थ अवर’ उपक्रमाअंतर्गत शहरातील पथदिवे बंद ठेवण्यात आले होते. त्यानिमित्त शहरातील सर्वाधिक वाहतुकीच्या स्टेशनरोडवर असे चित्र होते. छाया : आदित्य वेल्हाळ 

Web Title: Four thousand units of electricity saved in the form of 'Earth Hour'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.