प्लास्टिक वापराबद्दल चार व्यापाऱ्यांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:44 AM2021-02-28T04:44:44+5:302021-02-28T04:44:44+5:30

कोल्हापूर : शहरात बंदी असतानाही चार दुकानदारांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर केल्याबद्दल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे ...

Four traders fined for using plastic | प्लास्टिक वापराबद्दल चार व्यापाऱ्यांना दंड

प्लास्टिक वापराबद्दल चार व्यापाऱ्यांना दंड

googlenewsNext

कोल्हापूर : शहरात बंदी असतानाही चार दुकानदारांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर केल्याबद्दल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे वीस हजार रुपयांचा दंड वसूल केला. महापालिकेच्या पथकाने ही कारवाई केली.

सासने ग्राऊंड, पितळी गणपती व सिबीएस स्टँड या परिसरातील विजय स्टोअर्स, न्यू पार्क शॉपी, प्रिया कलेक्शन, श्री मेडिकल शॉपी या चार दुकानांवर प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई मार्केट आरोग्य निरीक्षक गीता लखन यांच्या पथकाने केली.

‘अग्निशमन’कडून मंगल कार्यालयावर कारवाई-

कोल्हापूर शहरात विना मास्क फिरणे, सामाजिक अंतर न ठेवणे, हॅण्डग्लोज न घालणाऱ्या ताराबाई पार्क, कावळा नाका, टिंबर मार्केट या परिसरातील मंगलकार्यालयाकडून पाच हजार रुपायांचा दंड वसूल करण‌ऱ्यात आला. महापालिकेच्या अग्निशमनच्या विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Four traders fined for using plastic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.