दसरा चौकात चारचाकीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:25 AM2021-04-24T04:25:20+5:302021-04-24T04:25:20+5:30

कोल्हापूर : दसरा चौक ते व्हिनस काॅर्नर या रस्त्यावर पुलानजीक उभ्या केलेल्या चारचाकीने शुक्रवारी सकाळी अचानक पेट घेतला. ...

Four-wheeler fire at Dussehra Chowk | दसरा चौकात चारचाकीला आग

दसरा चौकात चारचाकीला आग

Next

कोल्हापूर : दसरा चौक ते व्हिनस काॅर्नर या रस्त्यावर पुलानजीक उभ्या केलेल्या चारचाकीने शुक्रवारी सकाळी अचानक पेट घेतला. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वीच स्थानिकांनी ही आग आटोक्यात आणली. यात चारचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.

अग्निशमन दलाकडून मिळालेली माहिती अशी, दसरा चौक ते व्हिनस काॅर्नर रस्त्यावरील पुलानजीक एक चारचाकी उभी होती. शुक्रवारी सकाळी चारचाकीच्या पाठीमागील बाजूने धूर येऊ लागल्याचे येथील नागरिकांच्या निदर्शनाला आले. त्यांनी तत्काळ याची माहिती अग्निशमन दलाला दिली. मात्र, अग्निशमन दल येण्यापूर्वीच नागरिकांनी ही आग पाणी मारून विझवली. या आगीत चारचाकीचे मागील टायर व बाजूचे नुकसान झाले आहे. या चारचाकीच्या बाजूला कचरा पेटविण्यात आला होता, त्यामुळेच ही आग लागल्याची चर्चा परिसरात सुरु होती.

२३०४२०२१-कोल-चारचाकी

ओळी : कोल्हापुरातील दसरा चौक ते व्हिनस काॅर्नर मार्गावर शुक्रवारी सकाळी एका चारचाकीला आग लागली.

Web Title: Four-wheeler fire at Dussehra Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.