चार चोरट्या महिलांना अटक : दोन गुन्हे उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:19 AM2021-01-15T04:19:48+5:302021-01-15T04:19:48+5:30
आदमापूर येथे बाळूमामा मंदिरात मूर्तीचे मुखदर्शन घेताना १४ डिसेंबर २०२० रोजी सकाळच्या सुमारास पाचगाव येथील वृद्ध महिलेच्या गळ्यातील साडेतीन ...
आदमापूर येथे बाळूमामा मंदिरात मूर्तीचे मुखदर्शन घेताना १४ डिसेंबर २०२० रोजी सकाळच्या सुमारास पाचगाव येथील वृद्ध महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले होते. याप्रकरणी मुलगा सतीश पांडुरंग मगदूम यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली होती, तर आजरा तालुक्यातील मडिलगे येथील मुंबईस्थित शोभा मारुती पारळे ही महिला मडिलगे बुद्रुक, ता. भुदरगड येथे मावसभावाच्या लग्नाला आली होती. ही महिला आपल्या लहान बाळासह १४ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळच्या सुमारास गारगोटीला एसटीमधून येत असताना गारगोटी बसस्थानकावर बसमधून उतरत असताना पर्समधील साडेआठ तोळे सोन्याचे दागिने व दहा हजारांची रोकड, असा साडेचार लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. या दोन्हीही ठिकाणी झालेल्या चोरीच्या शोधार्थ पोलीस होते. या पूजा सकट, अर्चना चौगुले, सुवर्णा जाधव, मंदा सकट, चार चोरट्या महिलांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेऊन त्यांना भुदरगड पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्याकडून पोलिसांनी तपासात दोन गुन्ह्यांमधील बारा तोळे सोने ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश मयेकर, मनीषा मुगडे करीत आहेत.