‘होली क्रॉस’ स्कूल तडफोड प्रकरणी चौदा जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 08:45 PM2019-01-23T20:45:54+5:302019-01-23T20:47:20+5:30
कोल्हापूर येथील होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तडफोड केल्याप्रकरणी शाहुपूरी पोलीसांनी चौदा जणांना बुधवारी अटक केली. पोलीसांनी स्कूलमधील तोडफोडीचा पंचनामा केला असता सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. येथील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रसार माध्यमांच्या व्हिडीओ कॅमेऱ्यातील फुटेजवरुन आरोपींची नावे निष्पन्न करुन ही कारवाई करण्यात आली. अन्य संशयितांची धरपकड रात्री उशीरापर्यंत सुरु होती.
कोल्हापूर : येथील होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तडफोड केल्याप्रकरणी शाहुपूरी पोलीसांनी चौदा जणांना बुधवारी अटक केली. पोलीसांनी स्कूलमधील तोडफोडीचा पंचनामा केला असता सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. येथील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रसार माध्यमांच्या व्हिडीओ कॅमेऱ्यातील फुटेजवरुन आरोपींची नावे निष्पन्न करुन ही कारवाई करण्यात आली. अन्य संशयितांची धरपकड रात्री उशीरापर्यंत सुरु होती.
होली क्रॉस स्कूलमध्ये काही तरुणांनी घुसून स्कुलमधील साहित्याची तोडफोड केली होती. तसेच स्कूलच्या फीचे १९ हजार ५०० रुपये जबरदस्तीने चोरून नेलेप्रकरणी २४ जणांवर गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी बुधवारी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला असता एक लाख रुपयांचे नुकसान झाले. संशयितांवर गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करुन दिवसभर त्यांची धरपकड करण्यात आली.
संशयित किशोर घाटगे, सुनिल जाधव, रणजित नारायण जाधव, रोहन उर्फ सनी संभाजी अतिग्रे, तुकाराम अरुण साळोखे, राजू इसाक काजी, शैलेश शरदराव साळोखे, शाम काकापा जाधव, चेतन सुदर्शन शिंदे, प्रशांत प्रकाश जगदाळे, पियुष मोहन जाधव, विश्वदीप संजय साळोखे, योगेश विलासराव चौगले, अविनाश प्रकाश कामते अशी त्यांची नावे आहेत.