गतवेळी साडेचार टक्के मतदान, आता सत्तेच्या रेसमध्ये

By Admin | Published: October 6, 2015 01:06 AM2015-10-06T01:06:53+5:302015-10-06T01:11:32+5:30

भाजपची वाटचाल : या निवडणुकीत हवा; पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला; केंद्रात-राज्यातील सत्तेचा फायदा ले खा जो खा भाजप

Fourteen percent voting in the past, now in power race | गतवेळी साडेचार टक्के मतदान, आता सत्तेच्या रेसमध्ये

गतवेळी साडेचार टक्के मतदान, आता सत्तेच्या रेसमध्ये

googlenewsNext

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आज, मंगळवारपासून प्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्याच गतनिवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाची ताकद किती होती आणि आता त्यात नेमका काय बदल झाला आहे, याचा लेखाजोखा मांडणारी विश्लेषणात्मक राजकीय वृत्तमालिका आजपासून...
(उद्याच्या अंकात शिवसेना)
विश्वास पाटील ल्ल कोल्हापूर
महापालिकेच्या गतनिवडणुकीत आता राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला तेव्हा कशीबशी १३ हजार १०४ (साडेचार टक्केच) मते मिळाली होती. त्यांचे तिघे उमेदवार निवडून आले होते. भाजप म्हणजे विशिष्ट जातीचे प्राबल्य असलेला पक्ष, संघटनात्मक बांधणीकडे झालेले दुर्लक्ष आणि जिल्ह्यातील कोणतीच राजकीय सत्ता हाती नसल्याने या पक्षाच्या महापालिकेतील वाढीलाही मर्यादा पडल्याचे वास्तव होते. आता ही साडेचार टक्क्यांची नामुष्की मागे टाकून महापालिकेचीच सत्ता काबीज करण्यासाठी हा पक्ष सरसावला आहे.
महापालिकेच्या २०१०च्या निवडणुकीत भाजप व शिवसेनेची युती झाली होती. हे दोन्ही पक्ष त्यावेळी राज्यात व केंद्रातही विरोधात होते. दोन्ही पक्षांची युतीही भक्कम होती. या दोन पक्षांत जागांसाठी बरीच रस्सीखेच झाल्यानंतर भाजपच्या वाट्याला २३ जागा आल्या होत्या; तर चार ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली होती. त्यावेळी तत्कालीन आमदार चंद्रकांतदादा पाटील व आमदार राजेश क्षीरसागर यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध होते.
या निवडणुकीला सामोरा जाताना भाजपची ताकद सर्वच बाबतींत वाढली आहे. या पक्षाचे जिल्ह्यात आता तीन आमदार आहेत. त्याशिवाय महत्त्वाची पाच खाती असलेले कॅबिनेट मंत्रिपद चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे आहे. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे केंद्रात व राज्यात भाजपची एकहाती सत्ता आहे.
गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. ज्या भाजपची गेल्या निवडणुकीत १३ हजारांचा पल्ला गाठतानाही दमछाक झाली, त्याच पक्षाचे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार महेश जाधव यांना तब्बल ४० हजार मते मिळाली. कोल्हापूर दक्षिणमधून माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराचा पराभव करून भाजपमुळेच नवखे अमल महाडिक आमदार म्हणून निवडून आले. राज्यात सत्ता आल्यामुळे कार्यकर्त्यांचाही ओघ पक्षाकडे वाढला आहे. त्यामुळेच या निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीकडे कोल्हापूरसह राज्याचे लक्ष आहे.
भाजप राज्यात सत्तेत आल्यानंतर वर्षपूर्तीनंतर कोल्हापूर आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेतील निवडणूक होत आहे. त्यामुळे लोकसभा व विधानसभेला जे लोकमानस होते, तेच अजूनही कायम आहे की त्यात बदल झाला आहे, याचीही लिटमस टेस्ट या निवडणुकीमुळे होत आहे. म्हणूनच भाजपला या निवडणुकीत काही करून सत्ता हवी आहे. येथील भाजपचे यशापयश हे चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रतिष्ठेशी जोडले जाणार आहे. मग हे एकट्या भाजपच्या जिवावर शक्य नाही म्हणून त्यांनी ताराराणी आघाडीशी युती करून आव्हानात हवा भरली आहे. आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक यांच्या मदतीने भाजपचे कमळ महापालिकेत फुलविण्याची ही रणनीती आहे.

Web Title: Fourteen percent voting in the past, now in power race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.