किरणोत्सवाचा चौथा दिवस : सुर्यकिरणे अंबाबाईच्या खांद्यापर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 07:09 PM2020-11-11T19:09:25+5:302020-11-11T19:11:02+5:30
Mahalaxmi Temple Kolhapur, Religious Places कोल्हापुरातील श्री अंबाबाईच्या किरणोत्सवात बुधवारी मावळतीची सूर्यकिरणे देवीच्या खांदयापर्यंत आली. या किरणांच्या प्रतिबिंबामुळे देवीचा चेहराही उजळून निघाला. गुरुवारी या वर्षातील किरणोत्सवाचा अखेरचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी तरी किरणे मूर्तीच्या चेहऱ्यावर येतील अशी अपेक्षा आहे.
कोल्हापूर : कोल्हापुरातील श्री अंबाबाईच्या किरणोत्सवात बुधवारी मावळतीची सूर्यकिरणे देवीच्या खांदयापर्यंत आली. या किरणांच्या प्रतिबिंबामुळे देवीचा चेहराही उजळून निघाला. गुरुवारी या वर्षातील किरणोत्सवाचा अखेरचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी तरी किरणे मूर्तीच्या चेहऱ्यावर येतील अशी अपेक्षा आहे.
अंबाबाईच्या गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या किरणोत्सवांतर्गत चौथ्या दिवशी (बुधवारी) सूर्यकिरणांची तीव्रता अतिशय चांगली होती. त्यामुळे किरणे चेहऱ्यावर येवून किरणोत्सव पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. मात्र किरणे गाभाऱ्यात पोहोचल्यानंतर अचानक ढग आल्याने तीव्रता एकदमच कमी झाली. ४ वाजून ५९ मिनिटांनी किरणे महाद्वार कमानीत आली. तेथून पुढे ५ वाजून ४३ मिनिटांपर्यंतचा गाभाऱ्यापर्यंतचा प्रवास केल्यानंतर ५ वाजून ४४ व्या मिनिटांनी किरणांनी चरणस्पर्श केला.
५ वाजून ४८ व्या मिनिटांपर्यंत किरणे खांद्यापर्यंत पोहोचून लुप्त झाली. मात्र या किरणांचे प्रतिबिंब (वलय) देवीच्या चेहऱ्यावर पडल्याने अंबाबाईचे रुप या सोनेरी प्रकाशात उजळून निघाले. यावेळी देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार, सदस्य शिवाजीराव जाधव, राजू जाधव राहूल जगताप आदी उपस्थित होते.