चतुर्थ श्रेणी सरकारी कर्मचारी आजपासून संपावर-तीन हजार कर्मचाºयांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 07:47 PM2017-09-20T19:47:37+5:302017-09-20T19:49:23+5:30

कोल्हापूर : अनुकंपा सेवाभरती विनाअट करावी, चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्ग सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या एका पाल्यास शासन सेवेत सामावून घ्यावे, यासह

 Fourth Division Government employee from today, including three thousand employees | चतुर्थ श्रेणी सरकारी कर्मचारी आजपासून संपावर-तीन हजार कर्मचाºयांचा समावेश

चतुर्थ श्रेणी सरकारी कर्मचारी आजपासून संपावर-तीन हजार कर्मचाºयांचा समावेश

Next
ठळक मुद्दे‘सीपीआर’मधील कर्मचारी आज, मध्यरात्रीपासून संपावर शुक्रवारी या संपाचे परिणाम दिसून येणार शासनाने सकारात्मक प्रतिसाद देऊन मार्ग न काढल्यास बुधवार (दि. २७)पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अनुकंपा सेवाभरती विनाअट करावी, चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्ग सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या एका पाल्यास शासन सेवेत सामावून घ्यावे, यासह विविध मागण्यांसाठी आज, गुरुवार व उद्या, शुक्रवारी असे दोन दिवस सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी राज्यव्यापी संपावर जात आहेत. त्यामध्ये जिल्'ातील सुमारे तीन हजार चतुर्थश्रेणी कर्मचारी सहभागी होणार असून त्याला ३० हून अधिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. ‘सीपीआर’मधील सुमारे पाचशे कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर गेले.

या संपाबाबत पाच दिवसांपूर्वी राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील व्यापक शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाला इशारा दिला होता.संघटनेतर्फे राज्याध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. हा संप राज्यव्यापी असून राज्यभरात साडेतीन लाखांहून अधिक कर्मचारी सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १४ मार्च २०१७ रोजी झालेल्या बैठकीत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु अद्याप एकही मागणी शासनाने मान्य केलेली नाही. त्यामुळे कर्मचाºयांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामध्ये जिल्'ातील कर्मचारीही सहभागी होणार आहेत, असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश भोसले यांनी म्हटले आहे.

या संपात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर), महसूल, शिक्षण, आयटीआय, सार्वजनिक बांधकाम विभाग, तंत्रशिक्षण विभाग, कोषागार कार्यालय, विक्रीकर, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आदी विभागांतील शिपाई, सफाई कामगार, वॉर्डबॉय, चपरासी, चौकीदार, मुकादम, मजूर असे जवळपास तीन हजार चतुर्थश्रेणी कर्मचारी सहभागी होणार आहेत. या संपाला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती या शिखर संघटनेने पाठिंबा दिला आहे तर तीसहून अधिक चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनांनी पाठिंबा देऊन सक्रिय सहभाग घेतला आहे.
‘सीपीआर’मधील कर्मचारी आज, मध्यरात्रीपासून संपावर गेले.

सकाळी १० वाजता टाऊन हॉल उद्यान येथे सर्व कर्मचारी एकत्रित येणार आहेत. या ठिकाणी संघटनेचे नेते मार्गदर्शन करणार आहेत. आज, गुरुवारी घटस्थापनेची स्थानिक सुटी असल्याने सर्वच शासकीय कार्यालये बंद राहणार आहेत. त्यामुळे या संपाचा परिणाम अधिक जाणवणार नाही, परंतु उद्या, शुक्रवारी या संपाचे परिणाम दिसून येणार आहेत. या मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक प्रतिसाद देऊन मार्ग न काढल्यास बुधवार (दि. २७)पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

आंदोलकांच्या मागण्या
- वैद्यकीयदृष्ट्या अपात्र असलेल्या कर्मचाºयांच्या पाल्यास शासकीय सेवेत सामावून घ्यावे.
- सर्व खात्यांतील चतुर्थश्रेणी कर्मचाºयांची रिक्त पदे तत्काळ भरावीत.
- पदे भरताना चार टक्क्यांची अट रद्द करावी. सर्व खात्यांतील चतुर्थश्रेणी कर्मचाºयांना गृहखात्याप्रमाणे शासकीय वसाहत बांधून द्यावी.
- चतुर्थश्रेणीमधून तृतीय श्रेणीमध्ये २५ टक्क्यांऐवजी पाच टक्के पदोन्नती करताना चतुर्थ श्रेणीची पदे निरसित करू नयेत.
- सातवा वेतन आयोग फरकासह तत्काळ मंजूर करावा.
- महापालिका, नगरपालिकांना शासकीय कर्मचाºयांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करावा.

-
 

 

Web Title:  Fourth Division Government employee from today, including three thousand employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.