चौकटी (यंदा अकरावीच्या विज्ञानपेक्षा वाणिज्य इंग्रजीचा ‘कटऑफ’ वाढला)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:49 AM2020-12-05T04:49:29+5:302020-12-05T04:49:29+5:30

विद्यार्थ्यांना ‘एसएमएम’द्वारे माहिती पहिल्या फेरीत प्रवेशासाठी मिळालेल्या महाविद्यालयाची माहिती विद्यार्थ्यांना प्रवेश समितीकडून ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांना या फेरीत ...

Framework (Commerce English 'cutoff' increased this year over 11th grade science) | चौकटी (यंदा अकरावीच्या विज्ञानपेक्षा वाणिज्य इंग्रजीचा ‘कटऑफ’ वाढला)

चौकटी (यंदा अकरावीच्या विज्ञानपेक्षा वाणिज्य इंग्रजीचा ‘कटऑफ’ वाढला)

Next

विद्यार्थ्यांना ‘एसएमएम’द्वारे माहिती

पहिल्या फेरीत प्रवेशासाठी मिळालेल्या महाविद्यालयाची माहिती विद्यार्थ्यांना प्रवेश समितीकडून ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांना या फेरीत प्रवेश मिळाला नाही, त्यांनाही याबाबतचा एसएमएस पाठविण्यात आला. त्यासह महाविद्यालयांच्या नोटीस बोर्डवरही निवड यादी लावण्यात आली. ती पाहण्यास विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात गर्दी केली.

चौकट

अनुदानित महाविद्यालयांचा ‘कटऑफ’ वाढला

शहरातील विविध अनुदानित महाविद्यालयांतील कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेतील प्रवेशाचा कटऑफ गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाढला आहे. विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित तुकडीतील प्रवेशाचा कटऑफ मात्र दोन ते चार टक्क्यांनी कमी झाला आहे.

प्रवेशासाठी ही कागदपत्रे आवश्यक

मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला

आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जातीचा दाखला

आधारकार्डच्या दोन छायांकित प्रती आणि दोन छायाचित्रे

विद्यार्थिनींसाठी प्रतिज्ञापत्र

Web Title: Framework (Commerce English 'cutoff' increased this year over 11th grade science)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.