फसवणूक प्रकरणाचा सायबर सेलसोबत तपास सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:25 AM2021-07-31T04:25:50+5:302021-07-31T04:25:50+5:30
: इंग्लंडमधील बॅँकेत असलेले पाच कोटी रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून कागलमधील एकाची ३७ लाख ५५ हजार रुपयांची ...
: इंग्लंडमधील बॅँकेत असलेले पाच कोटी रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून कागलमधील एकाची ३७ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कागल पोलीस आणि जिल्हा सायबर सेल एकत्र तपास यंत्रणा राबवित आहेत. आरोपींनी जरी इग्ल॔ंडमधील बँकेचा व्यवहार दाखविला असला तरी हे आरोपी देशातीलच असावेत, या अनुषंगाने हा तपास सुरू आहे.
ऑनलाइन व्यवहाराच्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार झाल्याचे गुन्हे यापूर्वीही कागल पोलिसांत नोंद झाले आहेत; पण एवढ्या मोठ्या रकमेच्या आमिषाचा व फसवणुकीचा हा पहिलाच गुन्हा आहे. फसवणूक झालेले सतीश निकम आणि आरोपींनी निधन झालेले बँक खातेदार म्हणून नाव सांगितलेले. भरत निकम यांचा दुरान्वयाने कोठे संबंध नाही. कागल पोलिसांनी ऑनलाइन व्यवहाराची सर्व माहिती जमा करण्याचे आणि त्यासाठीचा पत्रव्यवहार करण्याचे काम सुरू केले आहे. सायबर गुन्ह्यातील संशयितांचीही माहिती घेतली जात आहे. आम्ही वेगळ्या माध्यमातून या रॅकेटपर्यंत लवकरच पोहोचू, असे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी सांगितले.