Kolhapur: बनावट कागदपत्रांद्वारे दोन कारची परस्पर विक्री करून २३ लाखांची फसवणूक, दोघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 11:38 IST2025-01-29T11:37:57+5:302025-01-29T11:38:49+5:30

कोल्हापूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे दोन कारची परस्पर विक्री करून २३ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा ...

Fraud of Rs 23 lakhs by selling two cars to each other using fake documents, two charged in Kolhapur | Kolhapur: बनावट कागदपत्रांद्वारे दोन कारची परस्पर विक्री करून २३ लाखांची फसवणूक, दोघांवर गुन्हा

Kolhapur: बनावट कागदपत्रांद्वारे दोन कारची परस्पर विक्री करून २३ लाखांची फसवणूक, दोघांवर गुन्हा

कोल्हापूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे दोन कारची परस्पर विक्री करून २३ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल झाला. न्यू शाहूपुरी येथील महालक्ष्मी मोटर्सचा प्रमुख संजय दत्तात्रय हवालदार (रा. कळंबा, ता. करवीर) आणि कार खरेदी करणारा मयूर बबन शेवाळे (रा. कोपरखैरणे, ठाणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत प्रशांत सुकुमार पाटील (वय ४९, रा. साई कॉलनी, पाचगाव) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पाचगाव येथील प्रशांत पाटील आणि त्यांचा भाऊ निशांत या दोघांना त्यांच्याकडील दोन जुन्या कारची विक्री करायची होती. न्यू शाहूपुरी येथील महालक्ष्मी मोटर्सचे प्रमुख संजय हवालदार याने दोन्ही कार २४ लाख ७५ हजार रुपयांना विकतो, असे सांगितले. यापैकी एक लाख रुपये देऊन दोन्ही कारचा ताबा घेतला. 

त्यानंतर बनावट कागदपत्रांच्या आधारे दोन्ही कार कोपरखैरणे येथील मयूर शेवाळे याला विकल्या. याबाबत विचारणा केल्यानंतर हवालदार याने उडवाउडवीची उत्तरे दिली. हा प्रकार १३ मे ते २३ ऑक्टोबर २०२४ दरम्यान घडला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Fraud of Rs 23 lakhs by selling two cars to each other using fake documents, two charged in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.