मॉलमध्ये खरेदीत सवलतीचे अमिष दाखवून १४ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:36 PM2020-12-11T16:36:58+5:302020-12-11T16:38:51+5:30
Crimenews, Kolhapurnews, police, गिफ्ट कार्ड खरेदी केल्यानंतर मॉलमधून इलेक्ट्रीक वस्तू निम्म्या किमत्तीमध्ये मिळतील, अशी अमिष दाखवून १४ लाखांहून अधिकची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या माध्यमातून मुंबईतील बाप लेकांनी कोल्हापुरातील सात जणांची फसवणूक केली असून त्यांच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
कोल्हापूर : गिफ्ट कार्ड खरेदी केल्यानंतर मॉलमधून इलेक्ट्रीक वस्तू निम्म्या किमत्तीमध्ये मिळतील, अशी अमिष दाखवून १४ लाखांहून अधिकची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या माध्यमातून मुंबईतील बाप लेकांनी कोल्हापुरातील सात जणांची फसवणूक केली असून त्यांच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
फसवणूक झालेल्या सात जणांच्यातर्फे असिफ सैदुल्ला पुणेकर (वय ४९, रा. नागाळा पार्क) यांनी तक्रार दिली. अविष्कार सुनील पाटील (वय २९) व वडील सुनील पाटील (दोघे रा. वरळी मुंबई) या संशियांतांवर गुन्हा नोंद झाला आहे.
शाहुपूरी पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, नागाळा पार्कमधील हिंद कॉलनी, केव्हीज पार्क येथे आसिफ पुणेकर राहतात. त्यांच्या भागात संशयित अविष्कार पाटील व सुनील पाटील हे राहण्यास आले होते. त्यातून त्यांची त्या दोघांबरोबर ओळख झाली.
संशयित अविष्कारने आपले वडील सुनील पाटील हे रिझर्व बँकेत नोकरीस आहेत. त्यांना दिवाळी निमित्त एका मॉलचे गिफ्ट कार्ड मिळाले आहे. कार्डद्वारे संबधित मॉलमधून कोणतीही इलेक्ट्रीक वस्तू ५० टक्के सवलतीने खरेदी करता येते असे अमिष दाखवले. याच पद्धतीने परिसरातील आणखी सहा जणांना कार्डचे अमिष दाखवले. त्याच्यावर विश्वास ठेऊन पुणेकर यांनी त्याला टप्प्याटप्याने ३ लाख ७५ हजार रूपये दिले.
पुणेकर यांच्यासह सात जणांकडून सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर २०२० अखेर ऑनलाईन, रोखीने असे एकूण १४ लाख १ हजार रुपय घेतले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे त्यांना कोणत्याही इलेक्ट्रीक अगर इतर वस्तू त्यांना मिळवून दिल्या नाहीते. ते दोघे कोणालाही न सांगता पसार झाले असल्याची फिर्याद पुणेकर यांनी दिली.
त्यानुसार वरळी मुंबईतील संशयित अविष्कार व त्याचे वडील सुनील पाटील या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला असून तपास पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्मिता पाटील करीत आहेत.