जागा खरेदीच्या बहाण्याने १५ लाखाची फसवणुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 06:39 PM2021-03-17T18:39:27+5:302021-03-17T18:41:18+5:30

Crime News Kolhapur-स्वता:ची जागा, घर या मालमत्तेचे खरेदीपत्र करुन देतो असे सांगून १५ लाख रुपये घेऊन ती मालमत्ता दुसऱ्यालाच विकून फसवणुक केल्याची तक्रार पुजा प्रकाश राजारामपूकर (वय ४७ रा. चव्हाण कॉलनी, कळंबा जेलसमोर, कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी संशयीत आरोपी महेश रामचंद्र गायकवाड (रा, पंचरत्न विहार अपार्टमेंट, सर्वे कॉलनी, सानेगुरुजी वसाहत) यांच्यावर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

Fraud of Rs 15 lakh under the pretext of buying land | जागा खरेदीच्या बहाण्याने १५ लाखाची फसवणुक

जागा खरेदीच्या बहाण्याने १५ लाखाची फसवणुक

Next
ठळक मुद्देजागा खरेदीच्या बहाण्याने १५ लाखाची फसवणुकमहिलेची पोलीसाकडे तक्रार : जागेची परस्पर दुसऱ्याला विक्री

कोल्हापूर : स्वता:ची जागा, घर या मालमत्तेचे खरेदीपत्र करुन देतो असे सांगून १५ लाख रुपये घेऊन ती मालमत्ता दुसऱ्यालाच विकून फसवणुक केल्याची तक्रार पुजा प्रकाश राजारामपूकर (वय ४७ रा. चव्हाण कॉलनी, कळंबा जेलसमोर, कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी संशयीत आरोपी महेश रामचंद्र गायकवाड (रा, पंचरत्न विहार अपार्टमेंट, सर्वे कॉलनी, सानेगुरुजी वसाहत) यांच्यावर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महेश गायकवाड याने स्वता:ची जागा व घर या मिळकतींचे खरेदीपत्र करुन देतो असे सांगून त्या मोबदल्यात पुजा राजापूरकर यांच्याकडून दि. २० मे २०१५ ते ऑगष्ट २०१९ पर्यत वेळोवेळी रोख व चेकने एकूण १५ लाख रुपये स्विकारले. पण संशयीत गायकवाड याने खरेदीपत्र करुन न देता तीच मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीला विक्री केली.

खरेदीपत्र करुन न दिल्याने राजारामपूरकर यांनी गायकवाड याच्याकडे दिलेले १५ लाख रुपये परत करण्याचा तगादा लावला. पण पैसे देण्यास टाळाटाळ करुन धमकी दिली. याबाबत राजापूरकर यांनी गायकवाड याच्याविरोधात फसवणुक केल्याची तक्रार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली.

Web Title: Fraud of Rs 15 lakh under the pretext of buying land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.