भाच्याकडून मावशीची २५ तोळे दागिन्यांसह २५ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 06:57 PM2021-07-05T18:57:02+5:302021-07-05T18:58:08+5:30
Crimenews Kolhapur: शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने वेळोवेळी मावशीकडून २५ लाख १७ हजार रुपयांची उचल केली. त्यासोबत २५ तोळे सोन्याचे दागिने परस्पर गहाणवट ठेवून फसवणूक केली. या प्रकरणी करवीर पोलिसांत संशयित भाच्याविरोधात सोमवारी गुन्हा नोंद झाला.
कोल्हापूर : शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने वेळोवेळी मावशीकडून २५ लाख १७ हजार रुपयांची उचल केली. त्यासोबत २५ तोळे सोन्याचे दागिने परस्पर गहाणवट ठेवून फसवणूक केली. या प्रकरणी करवीर पोलिसांत संशयित भाच्याविरोधात सोमवारी गुन्हा नोंद झाला. याबाबतची फिर्याद छाया राजाराम चव्हाण , रा. राहूल हॉटेलमागे, फुलेवाडी) यांनी दिली. निलेश राजकुमार पाटील (रा. बुधवार पेठ, ढिसाळ गल्ली ) असे गुन्हा नोंद झालेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी,यातील संशयित हा फिर्यादी छाया यांच्या बहीणाचा मुलगा आहे. त्याने स्वत: काम करीत असलेल्या अनघालक्ष्मी स्टॉक ब्रोकिंग प्रा.लि. नावाचे कंपनीत पैसे व सोने गुंतवा असे मावशीस सांगितले. त्यानूसार प्रत्यक्षात मावशीकडून वेळोवेळी घेतलेले २५ लाख १७ हजार रुपये घेतले.
त्यासोबतच गरजेसाठी त्यांचे नावे गहाण ठेवलेले २५ तोळे सोने दागिने परस्पर विकून मावशीचा विश्वासघात करून फसवणूक केली. याबाबत फिर्यादीने करवीर पोलिसांत तक्रार अर्ज दिला होता. चौकशीत फसवणूक झाल्याचे पुढे आले. त्यामुळे फिर्यादी छाया यांनी संशयिताविरोधात फिर्याद दिली. त्यानूसार करवीर पोलिसांनी संशयित निलेश विरोधात गुन्हा नोंदविला.