बेपत्ता झालेल्या सराफाकडून ६३ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 05:38 PM2020-10-30T17:38:46+5:302020-10-30T17:39:55+5:30
police, crimenews, kolhapurnews बाहेर विक्रीसाठी नेलेले सोन्या-चांदीचे दागिने घेऊन बेपत्ता झालेला संशयित सराफ श्रीकांत उर्फ अमित तवनाप्पा काते (वय ३७ रा. पाटील गल्ली,हुपरी) याच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात ६३ लाख रुपयांचे दागिने घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. लक्षतीर्थ वसाहत येथील दत्तात्रय दिनकर म्हसवेकर (वय ४३) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
कोल्हापूर : बाहेर विक्रीसाठी नेलेले सोन्या-चांदीचे दागिने घेऊन बेपत्ता झालेला संशयित सराफ श्रीकांत उर्फ अमित तवनाप्पा काते (वय ३७ रा. पाटील गल्ली,हुपरी) याच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात ६३ लाख रुपयांचे दागिने घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. लक्षतीर्थ वसाहत येथील दत्तात्रय दिनकर म्हसवेकर (वय ४३) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
म्हसवेकर हे सोन्या-चांदीचे दागिने तयार करणे, पॉलीस करणे, तयार दागिने व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी देण्याचे काम करतात. संशयीत काते हा सराफ व्यवसायिक असून कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक सराफांकडून तो दागिने घेऊन त्याची विक्री करून नंतर पैसे परत देतो. म्हसवेकर व त्यांचे मित्र सुभाष शिंदे (रा. उत्तरेश्वरपेठ) यांच्याकडून १२ मार्च ते १२ ऑगस्ट २०२० या कालावधीत ६३ लाख ८६ हजार ८५८ रुपयांचे दागिने काते याने विक्रीसाठी घेतले होते.
तेव्हापासून पैसे अथवा दागिने परत केलेले नाहीत. आपली फसगत झाल्याबद्दल या दोन सराफांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात श्रीकांत काते याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. काते याने एक कोटी रुपयांचे दागिने घेऊन पलायन केल्याची चर्चा शहरात सुरू आहे. त्याच्याकडे विक्रीसाठी ज्यांनी दागिने दिले ते सराफ व्यावसायीक अडचणीत आले आहेत. काते याच्यावर यापूर्वीही जुना राजवाडा पोलीस ठाण्यात सोन्याचे दागिने नेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे.