७५ लाखांची फसवणूक, बेळगावच्या एकाविरोधात गुन्हाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:43 AM2021-02-06T04:43:07+5:302021-02-06T04:43:07+5:30

कोल्हापूर : कर्नाटकमधील चार प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) स्मार्ट कार्ड बनविण्याचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून ७५ लाखांची ...

Fraud of Rs 75 lakh, crime against one from Belgaum | ७५ लाखांची फसवणूक, बेळगावच्या एकाविरोधात गुन्हाला

७५ लाखांची फसवणूक, बेळगावच्या एकाविरोधात गुन्हाला

Next

कोल्हापूर : कर्नाटकमधील चार प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) स्मार्ट कार्ड बनविण्याचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून ७५ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत गुरुप्रसाद जयसिंगराव शिंदे, रा. साळोखेनगर, कळंबा रोड यांनी जीवन राऊ कांबळे (रा. बेळगाव) याच्याविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले, गुरुप्रसाद यांचे कोल्हापुरात ग्लोबल कॉम्प्युटर इन्स्टिट्यूद्वारे संगणक क्लासेस होते. त्यावेळी खरी कॉर्नर येथील एचडीएफसी बँकेत पैसे भरण्यासाठी जात असत. तेथील शाखाधिकाऱ्यांनी असे पैसे बँकेत ठेवण्यापेक्षा गुंतवा म्हणून त्यांना सल्ला दिला आणि संशयित जीवन कांबळेची ओळख करून दिली. कांबळे याने व्हीनस कॉर्नरवरील मातोश्री प्लाझा येथे जेके सॉप्टेक प्रायव्हेट लिमिटेड व जेके ग्लोबल एन्टरप्रायझेस कंपन्यांचे कार्यालय उघडले होते. या कंपनीमार्फत कर्नाटकातील विजापूर, धारवाड, दावणगिरी, हुबळी येथील आरटीओ कार्यालयातील स्मार्ट कार्ड बनविण्याचे काम मिळवून देतो. त्याबदल्यात प्रत्येक वर्षी ८० लाख रुपयांचा फायदा होईल, असे आमिष शिंदे यांना दाखवून विश्‍वास संपादन केला.

त्यानंतर आतापर्यंत १ कोटी ३ लाख रुपये जीवनला दिले. नंतर त्याच्या हातापाया पडून २८ लाख रुपये परत मिळवले; परंतु कांबळेने येथील कार्यालय बंद केले असून तो बेळगावला राहण्यासाठी गेला आहे. कोल्हापुरात त्याने अनेकांना गंडा घातला आहे. तो अजूनही पैसे परत देतो, असे सांगत आहे; परंतु ते मिळत नसल्याने अखेर शिंदे यांनी त्याच्याविरोधात फिर्याद दिली आहे.

चौकट

वडील, भावजींचेही पैसे दिले

व्यवसायात पैसे गुंतवण्यासाठी शिंदे यांनी आपल्या वडिलांच्या पेन्शनचे आणि भावजींचेही पैसे कांबळेकडे दिले होते. त्याच्यामागे तगादा लावून काही पैसे परत मिळाले. मात्र, ७५ लाख रुपये अजूनही मिळालेले नाहीत.

----------

Web Title: Fraud of Rs 75 lakh, crime against one from Belgaum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.