कोल्हापुरात ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत पाळणाघर

By admin | Published: October 3, 2016 12:55 AM2016-10-03T00:55:53+5:302016-10-03T00:55:53+5:30

दिलीप घाटे यांचा उपक्रम : आपुलकीच्या गप्पांसाठी दिवसभराकरिता हक्काचे ठिकाण; उतारवयातील घुसमट कमी होण्यास मदत

Free Colleges for Senior Citizens in Kolhapur | कोल्हापुरात ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत पाळणाघर

कोल्हापुरात ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत पाळणाघर

Next

संतोष तोडकर ल्ल कोल्हापूर
एकल कुटुंबपद्धतीचा उदय शहरी संस्कृतीत झपाट्याने होत आहे. त्यामुळे घरी एकटे असणाऱ्या ज्येष्ठांशी बोलण्यासाठी फारसा वेळ कुणालाच नसतो. त्यांची हीच कुचंबणा लक्षात घेत दिलीप घाटे यांनी आपुलकीच्या गप्पांसाठी कोल्हापुरात ज्येष्ठांसाठी पाळणाघर (‘डे केअर सेंटर’) हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.
ज्येष्ठ नागरिकांना धाक दाखवून चोरीच्या घटनाही घडतात. मुलांनाही घरी परत जाईपर्यंत काळजी वाटते. सेवानिवृत्तीनंतर करायचे काय हा प्रश्न ज्येष्ठांना सतावतो. मुले-मुली, सुना आपापल्या करियरच्या धावपळीत इतकी मग्न असतात की त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी वेळ मिळत नाही. ‘आपल्याशीही कुणीतरी बोलावं’ अशी खूप इच्छा त्यांच्या मनात असते. किमान समवयस्कांशी गप्पा मारता याव्यात असे वाटत असते, यामधून ‘ज्येष्ठ स्त्री-पुरुषांसाठी पाळणाघर’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
प्रतिभानगर येथील स्वत:च्या फ्लॅटमध्ये हा उपक्रम घाटे यांनी सुरू केला असून समवयस्कांमध्ये मनमोकळेपणाने दिवस घालविणे, आपली सुख-दु:खे वाटून घेणे आणि उतारवयात होणारी मानसिक घुसमट कमी करणे हा यामागचा उद्देश आहे.
काही वेळेस आयुष्याचा जोडीदार सोडून गेल्याने वाट्याला आलेला एकटेपणा असह्य असतो. अशावेळेस गप्पा मारायला किंवा बोलावयास कोणीतरी लागते. आजूबाजूची सर्व मंडळी आपापल्या व्यापात बुडालेली असतात. त्यांना बोलावयास वेळही मिळत नाही. त्यांचेही काही चुकीचे नसते. घड्याळाबर हुकूम चालणाऱ्या आजच्या धकाधकीच्या जीवनात त्यांना भेडसावणाऱ्या समस्या इतक्या असतात की मनात असूनही त्यांना वेळ काढून घरातील ज्येष्ठांशी गप्पा मारणे जमत नाही. घरातील तरुण मंडळींनी वेळ काढून गप्पा मारण्याचे ठरविले तरी पिढीतील तफावतींमुळे त्या दोघांचे विचार जुळतीलच असे नाही. तरुणपिढीने तसेच ज्येष्ठ मंडळींनी एकमेकाला समजून घेऊन सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला तर त्याची परिणती सुसंवादात होईलच याची खात्री नाही. ज्येष्ठ मंडळी ही समवयीन ज्येष्ठ मंडळींत अधिक रमतात. समवयस्कांमध्ये त्यांचे विचार अधिक चांगल्यारितीने फुलण्यात ‘डे केअर सेंटर’ उपयुक्त ठरेल.
काय आहे हा उपक्रम :
विनामूल्य प्रवेश
वैयक्तिक माहितीचा फॉर्म भरून देणे आवश्यक
सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत समवयस्कांशी मजेत वेळ घालविण्याचे ठिकाण
स्वत:हून यावे किंवा मुले वा कुटुंबातील सदस्यांनी आणून सोडावे
स्वत:पुरते जेवण व गरजेची औषधे घेऊन यावे
कॅरम, बुद्धिबळ, पत्ते, लोडो, व्यापार आदी खेळांचे साहित्य मोफत उपलब्ध

Web Title: Free Colleges for Senior Citizens in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.