पार्वती औद्योगिक वसाहतीकडून मोफत कोविड तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:17 AM2021-06-26T04:17:22+5:302021-06-26T04:17:22+5:30
यड्राव : येथील पार्वती को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेटच्यावतीने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोफत कोविड तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी आदित्य ...
यड्राव : येथील पार्वती को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेटच्यावतीने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोफत कोविड तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी आदित्य राजेंद्र पाटील-यड्रावकर उपस्थित होते.
अनेक छोटे-मोठे उद्योग असलेली सहकार तत्वावरील सहकारमहर्षी स्व. शामराव पाटील-यड्रावकर यांनी उभारलेली पार्वती को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातील मोठी औद्योगिक वसाहत म्हणून परिचित आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वसाहतीमधील उद्योजक व कर्मचारी यांची खबरदारी म्हणून कोविड तपासणी करण्याच्या उद्देशाने मंगळवारी वसाहतीच्या प्रशासनाने कोविड तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामधून वसाहतीमधील अनेक उद्योजकांनी आणि वसाहतीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोविडची तपासणी करुन घेतली.
यावेळी महावीर खवाटे, बाळासाहेब केटकाळे, सरपंच कुणालसिंह नाईक-निंबाळकर, अभिजित पाटील, तलाठी नितीन कांबळे, ग्रामसेवक विष्णू गावडे, चंद्रकांत किनिंगे, स्वप्नील पाटील, अमोल पाटील, संजय चव्हाण, रमेश कांबळे, राजाराम शिंदे यांच्यासह अंगणवाडी सेविका व आरोग्यसेविका उपस्थित होत्या.