वरणगे पाडळीत कोरोना रुग्णांसाठी मोफत रिक्षा वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:23 AM2021-05-21T04:23:52+5:302021-05-21T04:23:52+5:30
प्रयाग चिखली : वरणगे पाडळी बु (ता. करवीर) येथील वसुंधरा प्रतिष्ठानतर्फे वरणगे, पाडळी व निटवडे येथील रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ...
प्रयाग चिखली : वरणगे पाडळी बु (ता. करवीर) येथील वसुंधरा प्रतिष्ठानतर्फे वरणगे, पाडळी व निटवडे येथील रुग्णांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यासाठी मोफत रिक्षा वाहतुकीची सोय करण्यात आली आहे.
कोरोना संसर्गजन्य रोग असल्यामुळे कोरोना महामारीच्या काळात गोरगरीब रुग्णांना कोल्हापूर तसेच इतर हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. ज्यांचे स्वतःचे वाहन आहे किंवा संबंधित नातेवाइकाचे वाहन आहे, त्या रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत जाण्यास फारशी अडचण येत नाही, पण ज्यांच्याकडे वाहन नाही आणि परिस्थिती गरीब आहे अशा रुग्णांना दवाखान्यात नेताना अडचणी येत आहेत. ही समस्या लक्षात घेऊन वसुंधरा प्रतिष्ठाने येथील भैरवनाथ टोपकर यांची रिक्षा रुग्णांना वाहतूक करण्यासाठी २४ तास मोफत उपलब्ध केली आहे.