‘मातोश्री’तील वृद्धांची वर्षभर मोफत दाढी-केस;शामराव शिंदे फौंडेशनचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 01:04 AM2019-01-01T01:04:58+5:302019-01-01T01:05:03+5:30

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : माजी महापौर अ‍ॅड. शामराव शिंदे फौंडेशनच्यावतीने नववर्षात विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा ...

Free Shaving Case for Older Entrepreneurs throughout the year; Shamrao Shinde Foundation's initiative | ‘मातोश्री’तील वृद्धांची वर्षभर मोफत दाढी-केस;शामराव शिंदे फौंडेशनचा उपक्रम

‘मातोश्री’तील वृद्धांची वर्षभर मोफत दाढी-केस;शामराव शिंदे फौंडेशनचा उपक्रम

Next

राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : माजी महापौर अ‍ॅड. शामराव शिंदे फौंडेशनच्यावतीने नववर्षात विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांचे वर्षभर मोफत दाढी-केस केले जाणार आहे. वृद्धाश्रमातील पुरुष व महिलांच्या हाता-पायाची वाढलेली नखेही कापून एकूणच त्यांना नीटनेटके ठेवली जाणार आहे. त्याशिवाय ‘सीपीआर’ रुग्णालयाच्या अपघात विभागाला चहा व कॉफीचे मशीनही दिले जाणार आहे.
अ‍ॅड. शामराव शिंदे यांनी सहकार चळवळ केवळ वाढविली नाही तर ती बळकट करण्याचे काम केले. विशेष म्हणजे कोल्हापूर शहरातील नामांकीत बँका, पतसंस्थांना घरघर लागली असताना शिंदे यांच्या नेतृत्वाखालील संस्था अधिक सक्षम झाल्या. त्यांनी सहकारात काम करत असताना सामाजातील वंचितांना सढळ हाताने मदत करण्याची भूमिका नेहमीच राहिली. याच जाणीवेतून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या मंडळींनी एकत्रित येत बारा वर्षांपूर्वी ‘अ‍ॅड. शामराव शिंदे फौंडेशन’ची स्थापना केली. अनेक फौंडेशन आहेत, पण त्यांच्याकडे सामाजिक दृष्टीचा अभाव दिसतो. शिंदे फौंडेशनने गेले बारा वर्षे समाजातील शोषित, वंचित व दुर्बल घटकांसाठी झोकून देऊन काम केले आहे. गेल्यावर्षी सीपीआरमधील रक्तपेढीला रक्त संकलन करण्यासाठी अत्याधुनिक खुर्च्या दिल्या. यावर्षी काहीतरी वेगळे करण्याचा त्यांचा मनोदय होता.
वृद्धाश्रमातील पुरुषांना त्यांची दाढी केस करण्यासाठी अर्धा किलोमीटर पायपीट करावी लागते. वयोमानानुसार ते थकल्याने त्यांना चालत जाऊन दाढी, केस करता येत नाहीत. त्यामुळे अनेक महिने केस, दाढी तशीच असते, परिणामी त्यांच्या एकूणच मानसिकतेवर परिणाम होतो. यासाठी ‘शिंदे फौंडेशन’चे सुमित्रादेवी शिंदे, अ‍ॅड. प्रशांत शिंदे, सुनील करंबे आदींनी पुढाकार घेऊन नववर्षावर एक चांगला संकल्प केला आहे. नागदेववाडी (ता. करवीर) येथील मातोश्री वृद्धाश्रमात जाऊन तेथील लोकांचे वर्षभर दाढी व केस करण्याचा संकल्प केला. त्याची शुक्रवार पेठेतील राजू सांगावकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. केवळ दाढी, केस न करता त्यांच्या हात व पायाची वाढलेली नखेही कापली जाणार आहेत.
दोनशेजणांना ‘लेझीम’चे प्रशिक्षण
लेझीम, दांडपट्ट्यासह इतर खेळ काळाच्या पडद्याआड निघाले आहेत. या खेळांची माहिती आजच्या पिढीला व्हावी, त्याचे शारीरिक महत्त्व कळावे, यासाठी फौंडेशनच्यावतीने लेझीमचा प्रशिक्षण वर्ग घेतला. यामध्ये दोनशेहून अधिक लोक सहभागी झाले.

Web Title: Free Shaving Case for Older Entrepreneurs throughout the year; Shamrao Shinde Foundation's initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.