बचाव कार्यातील जखमी जवानावर मोफत शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:26 AM2021-07-27T04:26:28+5:302021-07-27T04:26:28+5:30

कोल्हापूर : चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात महापूराची स्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले, महापुरात रेस्क्यू ऑपरेशन ...

Free surgery on injured rescue workers | बचाव कार्यातील जखमी जवानावर मोफत शस्त्रक्रिया

बचाव कार्यातील जखमी जवानावर मोफत शस्त्रक्रिया

Next

कोल्हापूर : चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात महापूराची स्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले, महापुरात रेस्क्यू ऑपरेशन करताना बोटीतून पडून गंभीर जखमी झालेल्या ‘एनडीआरएफ’चा जवान दयानंद गुरव याच्या हातावर सोमवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. बालिंगा (ता. करवीर) येथील डॉ अमर देसाई यांनी आपल्याच रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया व मोफत औषधे देऊन माणुसकीचे दर्शन घडवले.

सोमवारी दुपारी करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द येथे महापुराच्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबातील सदस्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी पुण्यातील ‘एनडीआरएफ’ची रेस्क्यू बोट जवानासह गावात पोहचले. पुरात अडकलेल्या कुटुंबांना घेऊन रेस्क्यू बोट काठावर पोहचली, बोटीतील जवान दयानंद गणपती गुरव हे तोल जाऊन पाण्यातील खडकावर आपटले. त्यांच्या हाताच्या मनगटाला गंभीर दुखापत झाली.

वेदनेने विव्हळणाऱ्या जवान गुरव यांना त्यांच्या सहकार्यांनी तातडीने बालिंगा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने डॉ अमर देसाई, डॉ दीपक शिंदे, डॉ चंद्रकांत नलवडे यांनी तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर शस्त्रक्रिया यशस्वी केली. हे जवान सेवा करण्यासाठी कोल्हापूरात आले होते, त्यामुळे त्यांच्यावर केलेल्या शस्त्रक्रियेचे पैसे स्वीकारण्यास संबंधित डॉक्टरांनी नकार दिला. तसेच माणुसकीच्या भावनेने जखमी जवानाला मोफत औषधे देऊन पाठवण्यात आले. ऐन महापुरात कोल्हापूरच्या डॉक्टरांनी माणुसकीचे दर्शन घडवल्याने जवान आणि सर्व टीमने कोल्हापूरकरांच्या माणुसकीचे आभार मानले.

फोटो नं. २६०७२०२१-कोल-फ्लड बालिंगे

ओळ : महापुरात अडकलेल्या पाडळी खुर्द येथील कुटुंबीयांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी महापुरात गेलेल्या रेस्क्यू बोटीतून पडून जखमी झालेल्या ‘एनडीआरएफ’ पथकातील जवान दयानंद गुरव याच्या हातावर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी गुरव यांच्यासह डॉ. अमर देसाई व एनडीआरएफचे जवान उपस्थित होते.

260721\26kol_1_26072021_5.jpg

ओळ : महापुरात अडकलेल्या पाडळी खुर्द येथील कुटूंबियांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी महापूरात गेलेल्या रेस्क्यू बोटीतून पडून जखमी झालेल्या ‘एनडीआरएफ’ पथकातील जवान दयानंद गुरव याच्या हातावर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी गुरव यांच्यासह डॉ अमर देसाई व एनडीआरएफचे जवान उपस्थित होते.

Web Title: Free surgery on injured rescue workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.