करवीरनिवासिनी श्री अंबाबाई भक्तांसाठी मोफत चहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 07:27 PM2019-01-17T19:27:16+5:302019-01-17T19:28:11+5:30
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शुक्रवारपासून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने मोफत चहाची सोय करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते व सदस्यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा प्रारंभ होणार आहे.
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शुक्रवारपासून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने मोफत चहाची सोय करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते व सदस्यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा प्रारंभ होणार आहे.
रोज दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत ही सोय असणार आहे. श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी रोज परस्थ भाविकांची मोठी गर्दी असते; पण मंदिराच्या आवारात पाणी वगळता अन्य सोईसुविधा नाहीत.
भाविकांना चहा हवा असेल तर परिसरात फिरणाऱ्या चहावाल्याचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे देवस्थान समितीच्या बैठकीत भाविकांना ठरावीक वेळेत मोफत चहा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा प्रारंभ होत आहे.