जवानांसाठी मोफत प्रवासाची सोय : दुग्गूनवाडीच्या मंगेशची अशीही देशभक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 11:40 AM2020-12-04T11:40:58+5:302020-12-04T11:43:35+5:30

IndianArmy, Kolhapurnews स्वत: सैनिक नाही अन् नातेवाईकांमध्येही कोणी सैनिक नाही. मात्र, सीमेवर निधड्या छातीने शत्रूशी दोन हात करणाऱ्या व अहोरात्र डोळ्यात तेल घालून देशसेवा बजावणाºया सैनिकांच्या आदरापोटी दुग्गूनवाडीच्या मंगेश सुतार यांनी खास सैनिकांसाठी सुरू केलेल्या उपक्रमाचे सैनिक व देशप्रेमीतून कौतुक होत आहे.

Free travel facility for the soldiers: Such patriotism of Mangesh of Duggunwadi | जवानांसाठी मोफत प्रवासाची सोय : दुग्गूनवाडीच्या मंगेशची अशीही देशभक्ती

 लिंगनूर काानूल (ता. गडहिंग्लज) येथे सुट्टी संपवून देशसेवेसाठी जाणारे जवान विशाल घुगरे यांना महेश सुतार यांनी आपल्या खास वाहनातून बेळगाव रेल्वेस्थानकापर्यंत सोडले. प्रारंभी सेवानिवृत्त सुभेदार रावसाहेब पाटील यांनी सुतार यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. याप्रसंगी जवान बसवराज पाटील, राहूल पाटील, दीपक देवार्डे व उत्तम जोशिलकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देजवानांसाठी मोफत प्रवासाची सोय : दुग्गूनवाडीच्या मंगेशची अशीही देशभक्तीसैनिकांतूनही उपक्रमाचे स्वागत

शिवानंद पाटील 

गडहिंग्लज :  स्वत: सैनिक नाही अन् नातेवाईकांमध्येही कोणी सैनिक नाही. मात्र, सीमेवर निधड्या छातीने शत्रूशी दोन हात करणाऱ्या व अहोरात्र डोळ्यात तेल घालून देशसेवा बजावणाऱ्या सैनिकांच्या आदरापोटी दुग्गूनवाडीच्या मंगेश सुतार यांनी खास सैनिकांसाठी सुरू केलेल्या उपक्रमाचे सैनिक व देशप्रेमीतून कौतुक होत आहे.

दुग्गूनवाडी (ता. गडहिंग्लज) येथील मंगेश जाधव यांनी जवानांना अभिमामाने घरापासून ते रेल्वेस्टेशन, विमानतळ किंवा बसस्थानकापर्यंत स्पेशल गाडीने सोडण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. स्वत: सुतार व त्यांचे मित्र अनुपम चिकरे हे सैनिकांना इच्छित ठिकाणापर्यंत सोडण्याचे काम करत आहेत. त्याबदल्यात ते कोणताही मोबदला घेत नाहीत. केवळ संबंधित सैनिकांनी बळजबरीने कांही दिले तरच ते स्विकारतात.

एखादा जवान शहीद झाल्यानंतर त्याचे पार्थिव घरी येवून अंत्यविधी होईपर्यंत गावकऱ्यांसह सीमाभागातील अनेकजण शहीद जवानांच्या कुटुंबियांना धीर देतात. मात्र, एखादा जवान सुट्टीवर गावी येताना किंवा पुन्हा सुट्टी संपवून देशसेवेसाठी जाताना त्यांना धीर देण्यासाठी कुटुंबीय सोडून कोणीही नसतात.


स्वत:ची व कुटुंबियांची काळजी न करता देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या सैनिकांच्या ऋणातून उतराई होण्यासाठीच हा उपक्रम सुरू केला आहे. सुट्टी संपवून पुन्हा सीमेवर जाणाऱ्या अनेक जवानांना सोडण्यासाठी जात असताना त्यांच्या व्यथा ऐकून क्षणभर त्यांच्याबद्दल अभिमानही वाटतो अन् मनही भरून येते.
- मंगेश सुतार,
दुग्गूनवाडी, ता. गडहिंग्लज.

 ८ दिवसात ११ जणांना सेवा

मुंबई येथील २६/११ च्या हल्यातील शहीदांना आदरांजली वाहून मंगेश यांनी या सेवेचा प्रारंभ केला. त्यांनी ८ दिवसात गडहिंग्लज, शिप्पूर, बुगड्डीकट्टी, हसूरसासगिरी, निपाणी, नेसरी, लिंगनूर येथील ११ जवानांना बेळगाव व कोल्हापूरच्या विमानतळ व रेल्वेस्थानकापर्यंत सेवा दिली आहे.


 

Web Title: Free travel facility for the soldiers: Such patriotism of Mangesh of Duggunwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.