जलयुक्तची कामे पाहण्यास मोफत प्रवास!

By Admin | Published: May 19, 2017 11:19 PM2017-05-19T23:19:20+5:302017-05-19T23:19:20+5:30

जलयुक्तची कामे पाहण्यास मोफत प्रवास!

Free travel to see the water works! | जलयुक्तची कामे पाहण्यास मोफत प्रवास!

जलयुक्तची कामे पाहण्यास मोफत प्रवास!

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसवड : ‘जलयुक्त शिवार अभियान यशस्वी करण्यासाठी जल नियोजनाबरोबरच पीकपद्धतीचे नियोजन केले तरच जलयुक्त शिवारमध्ये केलेल्या जलसंधारण कामाला खरे यश मिळून दुष्काळाला कायमचे हद्दपार करण्यात यशस्वी होऊ. तसेच सातारा जिल्ह्यातील जलयक्त शिवार अभियानाची कामे उत्कृष्ट दर्जाची झाली असून, लोकांच्या श्रमदानाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. चांगले काम करणाऱ्या गावांच्या पाठीशी शासन कायम राहणार आहे. चांगले उपक्रम राबविणाऱ्या किरकसालमधील जलयुक्तची कामे पाहण्यासाठी लोकांना ये-जा करण्यासाठी तिकिटाचे पैसैही देण्यात येतील,’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
किरकसाल (ता. माण) येथील जलसंधारणाच्या कामांच्या पाहणीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार जयकुमार गोरे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, पंचायत समितीचे सभापती रमेश पाटोळे, उपसभापती नितीन राजगे, जिल्हा परिषदेच्या सदस्या डॉ. भारती पोळ, तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ, प्रा. विश्वंभर बाबर, किरकसालचे सरपंच अमोल काटकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद यादव, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सुरेखा माने, गटविकास अधिकारी रवींद्रकुमार सांगळे व विविध विभागांचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘दुष्काळ हा मानवनिर्मित असून, तो हटविण्यासाठी निसर्गाचे देणे निसर्गाला परत केले पाहिजे, या संकल्पनेतून जलयुक्त शिवार या अभियानामार्फत गावागावांत पाणलोटची कामे सुरू आहेत. गावात हक्काचा पडणारा पाऊस गावातच मुरविण्यासाठी ग्रामस्थ श्रमदान करीत आहेत. किरकसाल गावाचे काम उत्कृष्ट दर्जाचे सुरू असून, हे काम राज्याला आदर्श ठरणार आहे. चांगले उपक्रम राबवणाऱ्या किरकसालमधील जलयुक्तची कामे पाहण्यासाठी लोकांना ये-जा करण्यासाठी तिकिटाचे पैसैही देऊ.’
‘राज्य शासनाच्या कृषी धोरणानुसार किरकसालमधील गटशेतीला प्राधान्य देऊन सर्व योजनांचा लाभ देऊ. तसेच वॉटर बजेटिंग चांगले झालेल्या गावांनी पीकपद्धती योग्य घेतली तर पुन्हा दुष्काळ पडणार नाही. किरकसाल या गावाने सरपंच अमोल काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंधारणाची चांगली कामे केली आहेत. ते पाहून समाधान वाटले. गावात ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी मी अवश्य येणार,’ असेही त्यांनी सांगितले.
गुढ्या उभारून मुख्यमंत्र्यांचे स्वागत..
किरकसाल ग्रामस्थांनी आपल्या घरासमोर गुढ्या उभारून तसेच सडा-रांगोळी काढून मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. किरकसाल गावासाठी विशेष बाब म्हणून पेयजल योजनेसाठी तातडीने निधीही मंजूर केल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह इतर मंडळींनीही श्रमदानाच्या ठिकाणी जलसंधारणाच्या कामाची पाहणी करून स्वत: श्रमदान केले.
मोहिते-पाटलांची उपस्थिती लक्षणीय...
गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही किरकसालमध्येच दौरा केला होता. त्याप्रसंगी माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील अनुपस्थित होते.
आजच्या दौऱ्यात मात्र राष्ट्रवादीच्या खासदारांची अर्थात विजयदादांची आवर्जून उपस्थिती सर्वांनाच प्रकर्षाने जाणवली.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना आदबीने मानसन्मान दिला.

Web Title: Free travel to see the water works!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.