पार्टी करताना मित्रात हाणामारी, चाकू हल्ल्यात जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 06:34 PM2021-05-29T18:34:36+5:302021-05-29T18:36:48+5:30
Crimenews Kolhapur : पार्टीच्या वेळी किरकोळ कारणांवरून मित्रांतच वादावादी होऊन झालेल्या चाकूहल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला. तर, झटापटीत दुसऱ्याला खिडकीची काच लागल्याने तोही जखमी झाल्याची घटना घडली. पृथ्वीराज उर्फ बबलू प्रकाश गवळी (वय २९ रा. साईगणेश कॉलनी, शिंगणापूर, ता. करवीर) व ओंकार रमेश कांबळे (वय १७, रा. शिंगणापूर) अशी दोन्हीही गटांच्या जखमींची नावे आहेत. पोलिसांनी एकास अटक केली.
कोल्हापूर : पार्टीच्या वेळी किरकोळ कारणांवरून मित्रांतच वादावादी होऊन झालेल्या चाकूहल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला. तर, झटापटीत दुसऱ्याला खिडकीची काच लागल्याने तोही जखमी झाल्याची घटना घडली. पृथ्वीराज उर्फ बबलू प्रकाश गवळी (वय २९ रा. साईगणेश कॉलनी, शिंगणापूर, ता. करवीर) व ओंकार रमेश कांबळे (वय १७, रा. शिंगणापूर) अशी दोन्हीही गटांच्या जखमींची नावे आहेत. पोलिसांनी एकास अटक केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी: शिंगणापूर येथे म्हसोबा मंदिरसमोर विद्यानिकेतन आवारात विनायक कांबळे याच्या खोलीत मित्रांनी पार्टी केली होती. या वेळी मित्रांत हाणामारीचा प्रकार घडला. चाकू हल्ल्यात गवळी हा गंभीर जखमी झाला. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार तेजस धनाजी चौगुले (वय २२, रा. शिंगणापूर) व एका अल्पवयीन मुलास अटक केली. तर, चौगुले याला करवीर पोलिसांनी अटक केली.
शिवाय, ओंकार रमेश कांबळे (रा. माळवाडी, शिंगणापूर) यानेही दिलेल्या तक्रारीनुसार बबलू गवळी याने आपल्याला उचलून किचनरूममध्ये नेऊन तेथे खिडकीवर आपटले, त्यात खिडकीची काच लागल्याने गंभीर जखमी झाल्याचे सांगितले. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार करवीर पोलिसांनी बबलू गवळी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.